सचिन संघई
जिल्हा प्रतिनिधी वाशिम
वाशिम :- वचन अकादमी पुणे व बसवविचार केंद्र, वाशिम यांच्या संयुक्त विद्यमाने कर्नाटकातील प्रसिद्ध साहित्यिक,पत्रकार रमजान दर्गा यांचे कन्नड मधिल शिवानंद, कोल्हापूर यांनी अनुवादीत केलेल्या समग्र बसवक्रांतीचा वचननामा या ग्रंथाचे प्रकाशन व गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान कार्यक्रम नुकताच शिवाजी सभागृहात संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य काशिनाथअप्पा लाहोरे प्रमुख अतिथी म्हणून राजे वाकाटक वाचनालयाचे ग्रंथपाल संतोष काळमुदंळे, दीपकआप्पा गाडे, ह. भ. प. विजयराव शिंदे, डॉ. विजय काळे, मोहन शिरसाठ, प्राचार्य हर्षाताई पसारकर, प्रा. गजानन वाघ, प्रा. राजाराम वामन, पत्रकार संदीपअप्पा पिंपळकर आदी मन आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात महात्मा बसवेश्वराच्या प्रतिमापूजनाने होऊन मान्यवराचा यावेळी यथोचित परिवर्तनाचा महामेरू ग्रंथ भेट देऊन सन्मान करण्यात आला. यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सचितानंद बिचेवार यांनी करून समग्र बसवक्रांतीचा वचननामा ग्रंथ प्रकाशना मागील हेतू, काल,आज आणि उद्या बसवण्णाच्या विचाराची प्रासंगिकता या अनुषंगाने वचना अकादमी व बसविचार केंद्र परिसरामध्ये कार्यरत असून जबाबदारी म्हणून वैचारिक परिवर्तनाचे काम या संस्था करत असल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर प्रा. गजानन वाघ, मोहन शिरसाठ, हर्षाताई पसारकर यांनी आपले विचार व्यक्त केले. ह.भ.प विजयराव शिंदे यांनी बसवेश्वरांच्या समग्र क्रांतिकारी विचाराचा महत्त्वपूर्ण सारांश यावेळी मांडताना बसवा सारखी महामानव मानव जातीला सातत्याने दिव्यदृष्टी देण्यासाठी तेवत असल्याचे सांगितले. वाशिमचे प्रसिद्ध कवी डॉ. विजय काळे यांनी आपल्या उत्स्फूर्त भाषणातून बसवण्णा हे सर्वांना आमचा म्हणायचे. आपण तेच विचार घेऊन पुढे चाललो पाहिजे आणि सर्व समाजाला एकतेच्या, समतेच्या भावाने बांधले पाहिजे असे त्यांनी सांगितले. ग्रंथपाल संतोष काळमुदंळे यांनी सुद्धा बसवण्णाची विचार क्रांती ही केवळ सांगून, बोलून चालणार नाही तर ती अमलामध्ये आणली पाहिजे, याची सुरुवात माझ्यापासून मी केलेली आहे. आपणही करावी असे त्यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाची सांगता होण्यापूर्वी समाजातील विविध क्षेत्रांमध्ये यशवंत/ गुणवंत ठरलेल्या निवडक विद्यार्थ्यांचा सन्मान यावेळी करण्यात आला.
या कार्यक्रमाचे संचालन प्रा. डॉ. श्रीनिवास हिंगमिरे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. अतुल राऊत यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बसविचार केंद्राचे अध्यक्ष विश्वनाथआप्पा महाजन, कैलासप्पा काष्टे, प्रा. डॉ. गजानन जनकवाडे, प्रा. डॉ. प्रशांत बुकने, प्रा. संजय लाहेवार, सदाशिव आप्पा आलमवार, आकाश आलमवार आदींनी प्रयत्न केले.



















