जिल्हा प्रतिनिधी पुणे
प्रवीण पप्पू शिंदे
रोटरी क्लब ब्लड बँक व कदम कृष्णा वैद्यकीय मदत कक्ष याचे संयुक्त विद्यमानेआज दिनांक ७ डिसेंबर २०२५ रोजी भव्य रक्तदान शिबिर आप्पा पाडा येथील जगदाळे विद्यालय येथे आयोजित करण्यात आले.
या कार्यक्रमास अखिल भारतीय मराठा महासंघ चे श्री.प्रशांत सावंत मुंबईचे सरचिटणीस श्री.बाळा लाड साहेब,मुंबई महिला अध्यक्ष सौ. सुवर्णा पवार,श्रीमती नम्रता भोसले,सरचिटणीस,श्रीमती स्मिता वारंग,खजिनदार
श्री.कदम साहेब, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य तथा मराठा समाज मालाड चे अध्यक्ष श्री.माधवराव पाटील,सरचिटणीस श्री. गोपीनाथ जगताप तसेच विभागातील विविध पक्षांचे पदाधिकारी यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून शुभेच्या दिल्या.आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली.रक्त दात्यांनी उस्फूर्तपणे रक्त दान केले त्यांचे प्रशस्ती पत्र आणि भेट देऊन मान्यवरांचे हस्ते सत्कार करण्यात आला.
अखिल भारतीय मराठा महासंघ मुंबई अध्यक्ष श्री.धोंडू जाधव आणि दिंडोशी विधानसभा अध्यक्ष श्री.प्रशांत सावंत यांचे मार्गदर्शना खाली आयोजित करण्यात आले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यात दिंडोशी विधानसभा अंतर्गत सर्व पदाधिकारी यांचे बहुमूल्य असे सहकार्य लाभले.



















