*.*
जिल्हा प्रतिनिधी पुणे. प्रवीण पप्पू शिंदे
*लाज-शरम खुंटीला टांगून ठेवूयात,*
*चला कार्यकर्ते आपण सतरंज्या, जोडे उचलूयात….*❗
*कोणी पार्थ घ्या,*
*कोणी रणजित घ्या,*
*कोणी आदित्य घ्या,*
*अमित घ्या,*
*कोणी रोहित घ्या,*
*अरे कोणी विख्यांचा सुजय घ्या.*
*घराणेशाही बळकट करूयात,*
*चला कार्यकर्ते आपण सतरंज्या, जोडे उचलूयात….*❗
*दत्तांची प्रिया अन महाजनांची पूनम,*
*शिंदेची प्रणिती,*
*तटकरेची आदिति,*
*गायकवडांची वर्षा,*
*सुळ्यांची सुप्रिया,*
*गांधींची प्रियंका अन मुंड्यांची प्रीतम अन पंकजा..*
*महिलाशक्तीचा जागर करूयात,*
*चला कार्यकर्ते आपण सतरंज्या, जोडे उचलूयात….*❗
*ठाकरे,महाजन,नाईक पवार,मुंडे,शाह,चौहान, चव्हाण,गांधी,मलिक आणि यादव घराणी*
*हीच तर देशाची खरी संपत्ती…*
*घराणेशाहीचा वारसा बळकट करूयात…*
*चला कार्यकर्ते आपण सतरंज्या, जोडे उचलूयात….*❗
*चपटीतला पेग,अन मटणाचं हाडुक,*
*आपापल्या साहेबांच्या कथा,अन भक्तीच्या गाथा…*
*चवीने पोटभर चघळूयात,*
*चला कार्यकर्ते आपण सतरंज्या, जोडे उचलूयात….*❗
*प्रपंचाची होळी,साहेबांची राजकीय पोळी,*
*बकाल आयुष्याचा तांडा, पण झेंड्याचा दांडा…*
*झुंडीने उंच उंच मिरवूयात*,
*चला कार्यकर्ते आपण सतरंज्या,*
*जोडे उचलूयात….*❗
*करतल,पादुका अन चरणस्पर्श,*
*हेच आपुले कर्म,अन हाच आपुला चरितार्थ…*
*जयजयकार अन गर्जनांनी साहेबांना वंदुयात*,
*चला कार्यकर्ते आपण सतरंज्या, जोडे उचलूयात….*❗
*देशभक्त तोच..जो सीमेवर मरे,*
*तुम्हा रोजच्या कार्यकर्त्यांच्या कुत्र्यागत मरण्यावर कोण रडे…*❓
*साहेबांच्या राष्ट्रभक्तीच्या मार्गावर चालूयात*,
*चला कार्यकर्ते आपण सतरंज्या, जोडे उचलूयात….*❗
*नेता झाला,नेत्याचा मुलगा, आणि पुतण्या आमदार,खासदार झाला, आता नातू आला,*
*कार्यकर्ता मात्र पुन्हा सतरंजी उचलण्यास तयार झाला..*
*अरे येडयांनो…*
*आपली परंपरा कायम राखुयात,*
*लाज-शरम खुंटीला टांगून ठेवूयात,*
*लेकरा बाळांची आभाळ करूयात,*
*चला कार्यकर्ते हो ….आपण कायमच सतरंज्या, जोडे उचलूयात….*❗
*हे लक्षात घेऊन आजपासून प्रारंभ करुया,*
*खूपच सुंदर लिहिलं आहे..ही राजकीय पोस्ट नाही,तर सत्य परिस्थिती सांगितलेली आहे. आवडल्याने जशास-तसे पुढे पाठवत राहावे अशी अपेक्षा….., जेणेकरून हे वाचल्यानंतर किमान एक तरी कार्यकर्ता घराणेशाहीच्या जीवावरील भाई – दादा- भाऊंचे जोडे उचलायचे बंद करेल…!!!*】
*सर्वांनी यातून बोध घेणे गरजेचे आहे.


















