रहिवाशांचा
आंबेगाव.
अवसरी खुर्द. अवसरी खुर्द मधील नंदी चौकात बिबट्या साठी आंदोलन करण्यात आली सर्व पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे देवदत्त निकम ठाकरे गटाचे सुरेश भाऊ भोर विष्णू काका हिंगे राष्ट्रवादी माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद अरुण भाऊ गिरे पंचायत समितीचे उपसभापती संतोष भोर प्रसाद अभंग प्रवीण टेमकर रवी वळसे पाटील मयूर भालेराव रमेश येवले मंचर नगरीचे माजी सरपंच दत्ता गांजाळे दामू अण्णा घोडे पिंपरखेड चे ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते महिला प्रतिनिधींनी पूजा वळसे आदींनी भाषणे केली ग्रामीण डीवायएसपी प्रशांत ढोले मंचर पोलीस स्टेशनचे निरीक्षक श्रीकांत कंकाळ. बडगुजर सर राजेश नलावडे पोलीस वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच उप विभागीय अधिकारी गोविंद शिंदे नायब तहसीलदार किरवे प्रामुख्याने उपस्थित होते. सर्व ग्रामस्थांची व नागरिकांची एकच मागणी आहे बिबट्याला मारण्याची शासनाने परवानगी द्यावी. पुन्हा नाशिक रोड जाम करण्यात आला. शांततेचे मार्गाने आंदोलन करण्यात आले. यावेळी कुठल्या प्रकारचे गालबोट लागले नाही. जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही अशी भूमिका सर्व खेड आंबेगाव जुन्नर रहिवाशांनी घेतली.


















