आनंद कुरुडवाडे
सर्कल प्रतिनिधि रामतीर्थ
बिलोलो तालुक्यातील रामतीर्थ परिसरातिल यंदा मे महिन्यातच मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून अधून मधून कोसळणारा पाऊस चांगला दमदार होता त्यानंतर मृग नक्षत्राला सुरुवात होतात पुन्हा पावसाने हजेरी लावली त्यामुळे शेतकऱ्यांनी कपाशी पेरणी सुरू केली मात्र पेरणीनंतर सलग आठवडाभर पावसाने पाठ फिरवली परिणामी अंकुरलेली पिके सुखायला लागली पावसा अभावी बियाणे माती त कुजण्याची भीती निर्माण झाली त्यामुळे आता शेतकऱ्यांचे डोळे पावसाकडे लागले असून शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकट भोगावत आहे कधी नव्हे तर पावसाने यंदा मे महिन्यातच दमदार हजेरी लावली शेतकऱ्यांनीही मान्सूनपूर्व पावसानंतर मशागतीची कामे आटोपताच जूनच्या पहिल्या हप्त्यातच पेरणीला सुरुवात केली मृग नक्षत्रात समाधानकारक पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवल्याने शेतकऱ्यांनी पेरण्या आटोपल्या मात्र सुरुवातीच्या दोन दिवसात रिमझिम पाऊस झाला सोयाबीन मुग उडीद कापुस ई,99 टक्के लागवड झाली त्यानंतर पाऊस मात्र थांबला परिणामी शिल्लक पेरण्या रखडल्या तर पेरणी केलेल्या बियाण्यातून अंकुर फोटो लागले मात्र पावसाअभावी कोमजण्याची भीती निर्माण झाली आहे तर वापलेल्या कोवळ्या पिकाची पिवळी पडत असून रोपेखाली माना टाकत आहे पिकांना वाचवण्याचे मोठे आव्हान आता सध्या शेतकऱ्यांपुढे उभे आहे शेतकऱ्यांच्या आभाळाकडे नजरा देवी देवतांना साकडे
