,*
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातामध्ये दुर्दैवी निधन झाल्यामुळे त्यांना श्रद्धांजली म्हणून अवसरी बुद्रुक पंचायत समिती गणामधून अपक्ष उमेदवार म्हणून प्रवीण (पप्पू) शिंदे ही निवडणूक लढवत होते, गेल्या अनेक वर्षापासून ते अजितदादांचे सच्चे कार्यकर्ते ओळख म्हणून काम करत होते, अजितदादासारखा थोर नेता अपघातामध्ये गमावल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र राज्य शोकसागरामध्ये मध्ये बुडाले असून राजकारणाच्या पटलावरील खऱ्या अर्थाने दादा हरपला आहे, अजितदादांना श्रद्धांजली म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला आहे, महाराष्ट्राचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्यामुळे शिंदे यांना महाराष्ट्र प्रदेश राज्य सचिव अखिल भारतीय माथाडी ट्रान्सपोर्ट जनरल युनियन महाराष्ट्र प्रदेश राज्य सचिव अशी जबाबदारी मिळाली असून प्रवीण शिंदे यांनी निवडणुकीत माघार घेतली असून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवाराला जाहीर पाठिंबा देण्याचे निश्चित केले आहे, प्रवीण शिंदे यांनी माघारी घेण्याचा निर्णय घेतल्यामुळे त्यांचे सर्व मतदार संघामधून कौतुक करण्यात येत आहे कार्यकर्ता असावा तर असा अशी भावना सर्व गणामधून व्यक्त होत आहे




















