*
प्रवीण (पप्पू) शिंदे
छत्रपती शिवाजी महाराजांचा ३९५ वा जन्म दिवस अर्थात शिवजयंती १९ फेब्रुवारी रोजी होत असून ही शिवजयंती प्रत्येकाने मनामनात आणि घराघरात साजरी करून शिवजयंती मनामनात शिवजयंती घराघरात अत्यंत उत्साहाने साजरी करावी असे आवाहन अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीपदादा जगताप यांनी केले आहे, अखिल भारतीय मराठा महासंघाकडून दरवर्षी शिवजयंती उत्सव अत्यंत उत्साहपूर्ण साजरा करण्यात येते याही वर्षी हा कार्यक्रम आगळ्या वेगळ्या पद्धतीने होणार असून शिवरायांचा आदर्श समाजामध्ये रुजवायचा असेल तर शिवजयंती उत्सव प्रत्येकाने साजरा करून शिवजयंती मनामनात शिवजयंती घराघरात साजरी करावी असे आवाहन करण्यात आले आहे




















