*
*अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांचे प्रतिपादन*
प्रवीण ( पप्पू) शिंदे
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र याव्यात अशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची इच्छा होती त्यानुसार त्यांच्या अकाली निधनामुळे दोन्ही काँग्रेसचे वरिष्ठ नेते वरिष्ठ पातळीवर हा निर्णय लवकरच घेतील, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसची सूत्रे सुनेत्रा पवार यांनी सांभाळावीत आणि त्यांना उपमुख्यमंत्रीपद देण्यात यावे अशी मागणी करणार असल्याचे प्रतिपादन नरहरी झिरवाळ यांनी नुकतेच केले आहे.
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नुकतेच विमान अपघातात निधन झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे ती भरून काढण्यासाठी सुनेत्रा पवार यांनी पक्ष नेतृत्वाची जबाबदारी सांभाळावी व त्यांची राज्याच्या उपमुख्यमंत्री पदी नेमणूक करण्यात यावी अशी मागणी अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी बारामती येथे केली आहे




















