*
*इतर पक्षांनी समाजाला हलक्यात घेऊ नये – अवसरी बु. मध्ये प्रविण शिंदेंच्या पाठीशी अभेद्य एकजूट*
पुणे जिल्हा जनसामान्यांच्या विकासनामा प्रतिनिधी
(अरुण कुरे)
अवसरी बु. पंचायत समिती गणाच्या निवडणुकीत मराठा समाजाने आता स्पष्ट आणि आक्रमक भूमिका घेतली असून, “समाजासाठी लढणाऱ्यांनाच मतदान” असा ठाम निर्धार केला आहे. मराठा आरक्षण चळवळीचे नेतृत्व करणारे मनोजदादा जरांगे पाटील यांच्या आंदोलनात नेहमीच सक्रिय सहभाग असलेल्या उमेदवारांनाच प्राधान्य देण्याचा निर्णय समाजाने घेतला आहे.
या पार्श्वभूमीवर प्रविण (पप्पू) महादेव शिंदे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून थेट रिंगणात उतरत सत्ताधाऱ्यांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. आरक्षण आंदोलनात रस्त्यावर उतरून संघर्ष, समाजासाठी सातत्याने केलेले योगदान आणि सर्वसामान्य मराठा कुटुंबांशी असलेला थेट संपर्क यामुळे प्रविण शिंदे हे समाजाच्या विश्वासाचे उमेदवार ठरत आहेत.
दरम्यान, इतर पक्षांनी मराठा समाजाला हलक्यात घेऊन दिशाभूल करू नये, असा स्पष्ट इशारा समाजबांधवांकडून देण्यात येत आहे. आज मराठा समाज अत्यंत एकजुटीने काम करत असून,
“ज्यांनी समाजासाठी झटले, त्यांनाच आता मतदानरूपी आशीर्वाद दिला जाईल,” अशी भावना गावागावात व्यक्त होत आहे.
मराठा सेवा संघाच्या माध्यमातून मा. दिलीपदादा जगताप, अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष, यांनीही थेट मैदानात उतरत कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना ठाम संदेश दिला आहे.
“हा समाजाचा शिलेदार आहे. प्रविण शिंदेंच्या पाठीशी उभे राहा; ही लढाई केवळ निवडणुकीची नाही, तर स्वाभिमानाची आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
मनोजदादा जरांगे पाटील यांच्या चळवळीशी निष्ठा, आरक्षण लढ्यातील ठाम भूमिका आणि समाजकार्याचा प्रदीर्घ अनुभव पाहता, अपक्ष असूनही प्रविण शिंदे हे अवसरी बु. पंचायत समिती गणात सत्ताधाऱ्यांसाठी गंभीर डोकेदुखी ठरत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
➡️ मराठा समाजाची अभूतपूर्व एकजूट, चळवळीतील कार्यकर्त्यांचा ओघ आणि ‘समाजासाठी झटलेल्यांनाच मतदान’ ही उसळलेली लाट पाहता, अवसरी बु. मधील ही निवडणूक राजकीय समीकरणे उलथवून टाकणारी ठरणार असल्याचे संकेत मिळत आहेत.




















