आंनद करूडवाडे
सर्कल प्रतिनिधि रामतीर्थ
रामतीर्थ बिलोली तालुक्यातील आळंदी येथील ग्रांमपचायतच्याकडून २४ रोजी येथील जिल्हा परिषद शाळा व गावातील सर्व अंगणवाडीसह छन उपक्रम लाभविले आवश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले आहे.आळंदी येथील ग्राम पंचायतच्या पंधरावा वित्त आयोगाच्या निधीतून साडे तीन लाख रुपयाचे साहित्य खरेदी करुन येथे असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ व्हावे व त्यांना संगणक हाताळता यावे म्हणून संगणक प्रिंटर, एलइडी टीव्ही भेट दिले. तसेच अंगणवाडीस गॅस, कपाट, कुकर,फॅन भेट देत ग्राम पंचायत कार्यालयात खुर्चा, कपाट, फॅन, एलईडी फोकस बसवण्यात आले. यावेळी ग्रामसेवक टी.एम. भायेगावे, सरपंच (प्र) मारोती धर्मकरे, उपसरपंच (प्र) उज्वल चट्टे, माजी उपसरपंच (प्र) विश्वनाथ अब्दागीरे, माजी उपसरपंच (प्र) बाळासाहेब चट्टे, माजी उपसरपंच आनंदा नायगावे, बाबुसाब शेख, बाबुराव चट्टे, संतोष जुकरे, नामदेव चिदमलवाड, जि. प. शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक नागेश मोतकुलवार, सहशिक्षक गजानन मानेकर, अंगणवाडी सेविका विमलबाई इबितदार, भुमिता आराळे, रेणुका स्वामी यासह गावातील प्रतिष्ठित व्यक्ती व गावकरी उपस्थीत होते.
