*
पुणे जिल्हा जनसामान्यांच्या विकासनामा प्रतिनिधी ( अरुण कुरे ):-
अवसरी बु. पंचायत समिती गणात प्रविण पप्पू महादेव शिंदे हे अपक्ष उमेदवार म्हणून थेट रिंगणात उतरले असून त्यांनी संपूर्ण निवडणूक रणांगणात मोठे आव्हान उभे केले आहे. आरक्षण चळवळीत सक्रिय सहभाग, समाजासाठी केलेले ठोस काम आणि तळागाळातील बांधिलकीमुळे शिंदे यांची उमेदवारी चर्चेचा केंद्रबिंदू ठरली आहे.
मराठा आरक्षण चळवळीत प्रविण शिंदे यांनी बजावलेली ठोस भूमिका आज त्यांच्या ताकदीची ओळख बनली आहे. समाजाच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करणारा उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात असून, “या निवडणुकीत प्रविण शिंदे यांना विजयी केल्याशिवाय मराठा समाज शांत बसणार नाही” असा ठाम इशारा समाज बांधवांकडून दिला जात आहे.
दरम्यान, अखिल भारतीय मराठा महासंघ संघाच्या माध्यमातून दिलीप दादा जगताप यांनी थेट मैदानात उतरत कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना स्पष्ट आदेश दिले आहेत.
“हा आपला शिलेदार आहे; प्रविण शिंदे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहा, एकजुटीने ताकद दाखवा,” असे आवाहन त्यांनी केले आहे.
प्रविण शिंदे यांनी आजपर्यंत केलेले सामाजिक योगदान, आरक्षण लढ्यातील आघाडीची भूमिका आणि सर्वसामान्य समाज घटकांशी असलेला थेट संपर्क पाहता, अवसरी बु. पंचायत समिती गणात अपक्ष असूनही ते सत्ताधाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत असल्याचे स्पष्ट चित्र आहे.
➡️ मराठा समाजाची एकजूट, संघटनांचा पाठिंबा आणि अपक्ष ताकदीची लाट पाहता, ही निवडणूक अवसरी बु. मध्ये मोठा राजकीय धक्का देणारी ठरण्याची चिन्हे आहेत.




















