प्रविण पप्पू शिंदे
जिल्हा प्रतिनिधी पुणे
*श्री क्षेत्र भीमाशंकर येथे दर्शनासाठी आलेल्या पंतप्रधानांच्या भावजय ज्योतिबेन मोदी,नेनताबेन मोदी,पुतणी सोनल प्रल्हाद मोदी व जावई विराग मोदी,वृद्ध ज्योतिबेन यांच्याकडे पैशाची मागणी केली.
*🚩भीमाशंकर मुक्ती आंदोलनाची गरज का आहे??????*🚩
१. खेड तालुक्यातील अतिशय महत्त्वाचे देवस्थान बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असल्याने विविध जिल्ह्यातून व अनेक राज्यांमधून देखील या ठिकाणी भाविक येतात.
2. . संपूर्ण देशभरातून येणाऱ्या भाविकांच्या मनावर देवस्थानाच्या ठिकाणी त्यांच्याशी होणाऱ्या वर्तणुकीमुळे अतिशय चुकीचा संदेश नकारात्मक संदेश देशभरामध्ये जातो आहे.
3. बिंदास चोरी करणे म्हणजे दरोडेखोरी असे म्हणतात.
4. अगदी त्याचप्रमाणे लाईनला उभे असणाऱ्या लोकांना भाविकांना जाणून-बुजून त्या ठिकाणी उशीर करायचा आणि दर्शनासाठी जास्त वेळ लागण्याची भीती दाखवायची व लवकर दर्शन करून देतो म्हणून पैसे मागायचे.
5. दर्शनासाठी कोणतीही पावती न देता पैसे मागणाऱ्या दलालांची वेगवेगळे रेट. काही दलाल एक हजार , काही दलाल 2000 , काही दलाल 500 रुपये प्रत्येकी वसूल करतात.
6. संघटित गुन्हेगारीचा अड्डा म्हणजे भीमाशंकर देवस्थान मधील व्यवस्था झालेली आहे.
7. अशा या व्यवस्थेला वठणीवर आणले नाही तर कालांतराने भीमाशंकर ला येणाऱ्या भाविकांची संख्या कमी होऊन केवळ धर्माची बदनामी नाही तर स्थानिक अर्थव्यवस्थेवर देखील त्याचा निश्चितपणे नकारात्मक परिणाम होईल.
8. त्या ठिकाणी अनेकांना संपर्क केला असता आणि त्यांची माहिती घेतली असता अनेकांचे असे म्हणणे आले की, स्थानिकांना रोजगार आणि पोट भरण्याचे साधन म्हणजे देवस्थानातील विविध बेकायदेशीर व अन्यायकारी उद्योग आहेत.
9. नक्कीच स्थानिकांना कोणत्याही क्षेत्रामध्ये प्राधान्य असणे अपेक्षित आहे. परंतु ही गोष्ट देवस्थानामध्ये लागू होत नाही.
10. आपल्या खेड तालुक्यामध्ये लाखो कामगार देशभरातून एमआयडीसी मध्ये काम करतात.
11. इतकेच नाही तर खेड सिटी मध्ये सेज प्रकल्प आहे. या ठिकाणी हजारो तरुण काम करतात. आपल्या तालुक्यामध्ये रोजगाराची कसलीही कमतरता नाही.
12. त्यामुळे केवळ रोजगार आणि पोट भरण्याचे साधन असं कारण सांगणारे दलाल हे कष्ट न करता पैसे कमावण्याचे साधन म्हणून भीमाशंकर देवस्थान या ठिकाणी येणाऱ्या श्रद्धालु यांच्याकडे पाहत आहेत. ही अतिशय गंभीर बाब आहे.
13. शासनाकडून विविध स्तरावर देवस्थान विकासाचे प्रयत्न सुरू असताना देखील जाणून-बुजून काही स्वार्थी लोकांच्या महत्त्वकांक्षीपयी भीमाशंकर देवस्थान बदनाम होत आहे.
14. चार किलोमीटरसाठी प्रत्येकी पन्नास रुपये, एका ईको गाडीमध्ये दहा जण, एकूण पाचशे रुपये त्या ठिकाणी जायला लागणारा वेळ पाच मिनिटे. संपूर्ण देशभरात अशी कुठेही परिस्थिती नाही.
15. अनेक पार्किंग ज्या देवस्थानच्या जवळ आहेत त्यांचं नंबर इन केलेले आहे परंतु असे असताना देखील देवस्थान पासून सहा किलोमीटर दूर जाणून-बुजून डेरी गेट लावून पार्किंग करायला लावणे चुकीचे आहे.
16. दूर गाडी पार्किंग केल्यामुळे लोकांना मजबुरीने भाड्याच्या गाडीमध्ये देवस्थानापर्यंत जाणं भाग पडतंय.
17. लोकांच्या सुरक्षेसाठी भाविकांच्या सुरक्षेसाठी पार्किंग आणि सुव्यवस्था अपेक्षित आहे. परंतु प्रत्येक पार्किंग मध्ये पार्किंग नंबर एक पार्किंग नंबर दोन पार्किंग नंबर तीन या सर्व पूर्ण भरल्यानंतरच रीतसर इतर पार्किंग मध्ये गाड्या लावल्या गेल्या पाहिजेत. परंतु तसं होत नाही.
18. मंदिराच्या जवळच्या पार्किंग जाणून-बुजून मोकळ्या ठेवल्या जात असून मंदिराच्या लांब असणाऱ्या पार्किंग मध्ये गाडी लावणे व गाड्या लावायला सांगणे हे एक भ्रष्टाचार करण्याचं माध्यमच आहे.
19. अनेक लोकांनी स्पष्टपणे मला कॉल करून सांगितले की त्या ठिकाणी गाडी सोडण्यासाठी दोन दोन हजार रुपये प्रत्येक गाडीचे घेतले जातात. म्हणजे दोन हजार रुपये दिले तर गाडी सोडली जाते देवस्थानापर्यंत जाण्यासाठी. अन्यथा सहा किलोमीटर दूर असणाऱ्या पार्किंग मध्ये तुमची गाडी पार्क करण्यासाठी सांगितली जाते.
20. अभिषेक करताना मुख्य गाभाऱ्यात केल्यामुळे त्या ठिकाणी दर्शनासाठी लोकांना उशीर होतो. म्हणून अभिषेक हा करण्यासाठी मंदिराच्या जवळच इतर ठिकाणी सुविधा करून त्या ठिकाणी अभिषेक केला गेला पाहिजे.
21. जेणेकरून दर्शनासाठी असणाऱ्या रांगेला उशीर होणार नाही. परंतु दर्शनासाठी असणाऱ्या रांगेला उशीर करणे जास्त परेशान करणे हाच त्यांचा महत्त्वाचा उद्देश असतो.
22. कारण दर्शनाच्या रांगेत उभे राहणाऱ्या माणसांना जास्त परेशानी झाली तरच तेथील रांगेतील लोक मोठी रक्कम देऊन डायरेक्ट दर्शनाची अपेक्षा ठेवतील अशी तेथील दलालांना अपेक्षा असते.
23. दर्शनासाठी व्हीआयपी पासची सुविधा असताना देखील जाणून-बुजून व्हीआयपी पासची खिडकी जास्त करून बंदच असते.
24. कारण व्हीआयपी पास देऊन दर्शनासाठी लोकांना पाठवले तर वैयक्तिक घरे आणि खिसे भरणार कसे???????.
25. पावती रीतसर देण्यासाठी अनेक भाविक उत्सुक असतात. परंतु तशी व्यवस्था त्या ठिकाणी असणे अपेक्षित असते. आणि येथील दलालांना पावती विषयी काहीही घेणेदेणे नाही.
26. रीतसर पावत्या दिल्या तर आणि देवस्थानामध्ये तिजोरी मध्ये देणगी जमा झाली तर देवस्थानाकडून चांगल्या सुधारणा केल्या जाऊ शकतात.
27. परंतु सुधारणा ही देवस्थानाची तेथील दलालांना नको आहे.
28. सुधारणा फक्त तेथे फिरणाऱ्या गावगुंड आणि दलालांचीच होत आहे.
29. दिवस रात्र आपल्या दुकानात बसणाऱ्या दुकानदारांना देखील दुःख वाटत असतील की आपण दिवसभर प्रसाद विकण्यासाठी बसतो. परंतु आपल्यापेक्षा जास्त पैसे तर दलालच कमावतात जे दर्शनासाठी घेऊन जातात भाविकांना.
30. या सर्व गोष्टी अतिशय क्लेशदायक आहेत. खरंतर मानसिक शांतीसाठी समाधानासाठी आपण कोणत्याही देवस्थानी जातो. परंतु या सर्व गोष्टी आपल्याला मिळतात का?????????
31. नाहक त्रास त्या ठिकाणी गेल्यावर होतो आणि असे असताना देखील कोणताही भाविक सहजासहजी त्या ठिकाणी चुकीच्या कामांचा विरोध करत नाही याचा अर्थ त्याच्या मनामध्ये त्याच्या हृदयामध्ये दुःख होत नाही का???????????
32. भाविकाच्या मनातल्या भावना त्याचे दुःख हे ईश्वर जाणून घेत नाही का???????? भाविकाच्या मनातल्या भावना जरी बोलून काहींनी दाखवल्या नाही तरीसुद्धा त्या ईश्वरापर्यंत पोहोचतातच आणि ईश्वर नेहमी या सर्व गोष्टींचा विरोध करण्यासाठी कोणालातरी साधन बनवत असतो.
33. मला वाटतं आपल्या खेड तालुक्यातील पुणे जिल्ह्यातील हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक महत्त्वाचे देवस्थान भीमाशंकर असल्याकारणाने आपल्या सर्वांची एक नैतिक जबाबदारी आहे की बाहेर गावावरून इतर राज्यांमधून येणाऱ्या भाविकांना या ठिकाणी चांगल्या वर्तणुकीचा अनुभव आला पाहिजे. आपली संस्कृती आपले विचार आणि एक आदर्श घेऊन या ठिकाणी येणारा भाविक गेला पाहिजे.
एक दर्शणार्थी एक भाविक म्हणून आपणा सर्वांना ही विनंती करतो की हा संदेश संपूर्ण खेड तालुक्यात संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये गेला पाहिजे. हा संदेश मुख्यमंत्र्यांपर्यंत गेला पाहिजे.
जयहिंद
