सुधीर जाधव
तालुका प्रतिनिधी, सातारा.
सातारा : येथे जिल्ह्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा सुरू असताना कोडोली शाळेमधील विविध कार्यक्रम झाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोडोली येथील प्रदीप उर्फ रवी साळुंखे यांच्या निधनानंतर सांत्वनासाठी घरच्यांना भेट दिली. त्यांच्या समवेत आमदार महेश शिंदे आमदार मनोज घोरपडे यांची देखील उपस्थिती होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घरातल्यांसोबत अर्धा तास चर्चा केली तसेच कोडोली भागामध्ये संघटन बांधण्यामध्ये प्रदीप उर्फ रवी साळुंखे यांनी खूप महत्त्वाचा मोलाचा वाटा उचलला आहे असे यावेळी महेश शिंदे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलताना सांगितले. कोडोली भागातील एक चांगला नेता गेला त्याच्या जाण्याने भागातील अनेक लोकांना मोठा धक्का बसला आहे. असे तेथील नागरिकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलताना सांगितले. यावेळी मनोज गायकवाड व ग्रामपंचायत कोडोली सदस्य व नागरिक उपस्थित होते.
