प्रवीण पप्पू शिंदे
जिल्हा प्रतिनिधी पुणे
आषाढी वारी निमित्त संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा प्रशासनाने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पालखी मार्गावरील हॉटेल ढाब्यावर वारी काळात मद्य विक्री व मांस विक्रीला पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप सिंग यांनी पत्रकार परिषद मध्ये माहिती दिली
