सुधीर जाधव
तालुका प्रतिनिधी, सातारा.
सातारा : दि. 14 आंबवडे बु. येथे महाराष्ट्र शासन कृषी विभागा मार्फत खरीप हंगाम पूर्व नियोजन व गट शेती तयारी कार्यक्रम घेण्यात आला व नैसर्गिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले.
यामध्ये मंडळ कृषी अधिकारी शिवदास कदम यांनी नैसर्गिक शेती का गरजेची आहे व ती कशी करावी याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले तर आर. वाय. जाधव सर यांनी नैसर्गिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे कौतुक केले व इतरही शेतकऱ्यांनी त्यांचा आदर्श घेऊन आपली शेती विषमुक्त करणे काळाची गरज आहे. असे सांगून त्यांच्या हस्ते नैसर्गिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.
गट शेती तयारी यामध्ये फार्मर कप तालुका मेंटर सुधीर कोरे यांनी कमी खर्चात उत्पादन वाढीसाठी गट शेती गरजेची असून फार्मर कप स्पर्धेची शेतकऱ्यांना माहिती देऊन फार्मर कप स्पर्धेत सहभागी शेतकऱ्यांचे अभिनंदन केले. स्पर्धेतील गुणांक कशा पद्धतीने आहे. ते गुण मिळवण्यासाठी कशी तयारी करायची याविषयी सखोल माहिती दिली व फक्त स्पर्धेत गुण मिळवणे महत्त्वाचे नसून स्पर्धेच्या निमित्ताने आपले कमी खर्चात उत्पन्न वाढणार आहे. असे सांगून स्पर्धेसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले.
खरीप हंगाम पूर्व नियोजन तयारी कशी करायची हे उप कृषी अधिकारी सुशांत देसाई यांनी माहिती दिली. शेती मशागत बी निवड आणि नियोजन कसे करायचे विकत घेतलेले बी पेरणी करताना कोणती काळजी घ्यायची त्यासाठी काय करणे गरजेचे आहे याची सविस्तर माहिती दिली बी खराब लागल्यानंतर, बी विकणाऱ्या कंपन्यांकडे कशा पद्धतीने आपण दावा करू शकतो त्यासाठी आपल्याकडे आवश्यकता असणारे पुरावे शेतकऱ्यांनी कशा पद्धतीने संकलित करून ठेवायचे याविषयी सविस्तर माहिती दिले व घरगुती बियाणे कशा पद्धतीने पेरणी योग्य त्याची साठवणूक करायची याविषयी माहिती दिली.
निवड केलेल्या बी पेरणी करण्या अगोदर बीज प्रक्रिया कशी करायची याचे प्रात्यक्षिक कृषी सहाय्यक अनिकेत शेळके यांनी शेतकऱ्यांना करून दाखवले. तर नैसर्गिक पद्धतीने बीज प्रक्रिया कशी करायची ही माहिती कृषी सखी अश्विनी जाधव यांनी शेतकऱ्यांना दिली.
कार्यक्रमाचे आयोजन कृषी सहाय्यक नितीन घाडगे आणि लवकुमार यादव यांनी केले. तर संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन मा. ग्रा.पं. सदस्य सचिन देशमुख, विकास सेवा सोसायटी व्हा. चेअरमन महेश व कृषी सखी निकिता जाधव यांनी केले.
कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती मा. डी. वाय. एस. पी. नारायण जाधव, मा. शिक्षक बँक संचालक राजकुमार जाधव, मा. ग्रा.पं. सदस्य जीवन पवार, पूनम जाधव ग्रा.पं. कर्मचारी श्रीकांत जाधव, दिपाली लोहार, बीएसएफ संघ जिल्हा अध्यक्ष मोहन धोंडवाड, डॉ. जगदीश जाधव, फौजी दत्तात्रय देशमुख, इत्यादी शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते.


















