आंबेगाव प्रवीण पप्पू शिंदे
ताई म्हणजे केवळ साहेबांची जीवनसंगिनी नव्हे, तर संपूर्ण आंबेगाव-शिरूर मतदारसंघाचे मातृछत्र! १९९० पासून आजतागायत त्यांचा तोच साधेपणा, तीच माणुसकी आणि प्रत्येकाची आस्थेवाईक चौकशी करण्याची वृत्ती सर्वांनी जवळून अनुभवली आहे. साहेबांच्या राजकीय प्रवासात खंबीरपणे पाठीशी उभ्या राहतानाच, मतदारसंघातील प्रत्येक सामाजिक आणि शैक्षणिक कार्यात त्यांनी जिव्हाळ्याचे नाते जपले आहे.
विशेष म्हणजे, योगायोगाने आज ‘मदर्स डे’ आहे… आणि ताईंची माया खऱ्या अर्थाने आईसारखीच आहे. आज जेव्हा मी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी फोन केला, तेव्हा त्यांनी शुभेच्छांचा स्वीकार तर केलाच, पण एका आईच्या मायेने माझी विचारपूसही केली. “बाळा, बाहेर ऊन खूप आहे, स्वतःची काळजी घे. सोबत कांदा आणि गूळ ठेव…” असे सांगून त्यांनी उन्हापासून संरक्षणाचे जे उपाय सांगितले, ते ऐकून मन भरून आले. राजकारणाच्या धावपळीतही आपल्या कार्यकर्त्याची एका आईसारखी काळजी घेणारी अशी ‘माऊली’ मिळणे हे आमचे भाग्य आहे.
ताईंच्या हातचे ते चविष्ट रव्याचे लाडू आणि त्यांचा प्रेमाचा आग्रह आजही अनेकांच्या स्मरणात घर करून आहे. मतदारसंघाची “माऊली आणि सावली” ही त्यांची प्रतिमा त्यांच्या निस्वार्थ प्रेमाची पावतीच आहे.
अशा या प्रेमळ माऊलीस उदंड आयुष्य लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!

















