🏛️ *
आंबेगाव प्रवीण पप्पू शिंदे
मुख्यमंत्री *देवेंद्र फडणवीस* यांच्या अध्यक्षतेखाली १४ मे २०२६ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सरकारने विविध क्षेत्रांशी संबंधित *१४ महत्त्वपूर्ण निर्णय* घेतले.
या निर्णयांचा फायदा शेतकरी, शिक्षक, विद्यार्थी, कोकणातील नागरिक, साहित्य संस्था, वैद्यकीय संस्था आणि विविध विभागातील कर्मचाऱ्यांना होणार आहे.
━━━━━━━●━━━━━━━
📢 *सरकारी ━━━━
🌟 *मंत्रिमंडळ बैठकीतील १४ महत्त्वाचे निर्णय*
1️⃣ *सिंधुरत्न समृद्ध योजना 2.0*
▪️ सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी ही योजना आणखी *३ वर्षे* राबवली जाणार.
2️⃣ *संत्रा आयात शुल्क परतावा योजना रद्द*
▪️ बांग्लादेश निर्यातीवरील ५०% अनुदान योजना बंद करण्याचा निर्णय.
3️⃣ *राखीव प्रवर्गातील उमेदवारांबाबत निर्णय*
▪️ वय, पात्रता व इतर सवलती घेतलेल्या उमेदवारांची नियुक्ती आता *राखीव प्रवर्गातच* होईल.
4️⃣ *पाटबंधारे प्रकल्पातील गाळ काढण्याचे सुधारित धोरण*
▪️ सहा मोठ्या प्रकल्पांत प्रायोगिक तत्त्वावर गाळ काढला जाईल.
5️⃣ *अंबोली-वेळुंजे प्रवाही वळण योजना*
▪️ नाशिक जिल्ह्यासाठी *₹49.26 कोटींची मंजुरी*.
6️⃣ *आश्रमशाळेतील शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी*
▪️ १२ व २४ वर्षांच्या सेवेनंतर लाभ.
7️⃣ *कुसुमाग्रज प्रतिष्ठान, नाशिक*
▪️ दरवर्षी *₹10 लाख अनुदान*.
8️⃣ *नाशिक रिंग रोड प्रकल्प*
▪️ जमीन खरेदीवरील मुद्रांक शुल्कात सवलत.
9️⃣ *मृद व जलसंधारण विभाग*
▪️ एकूण *8,767 पदांना मान्यता*.
🔟 *पुणे नदी पुनरुज्जीवन प्रकल्प*
▪️ तीन शासकीय जमिनी पुणे महानगरपालिकेला विनामूल्य हस्तांतरित.
1️⃣1️⃣ *पनवेल येथे शैक्षणिक संस्थेला जमीन*
▪️ रितनंद बलवेद एज्युकेशन फाउंडेशनला मंजुरी.
1️⃣2️⃣ *वैद्यकीय संस्थांना विकास शुल्कात 50% सवलत*
▪️ यापूर्वीची 25% सवलत वाढवली.
1️⃣3️⃣ *अनुसूचित जमाती आयोग*
▪️ उपाध्यक्ष पदाची निर्मिती.
1️⃣4️⃣ *अनुसूचित जाती आयोग*
▪️ उपाध्यक्ष पदाची निर्मिती.
━━━━━━━●━━━━━━━
📌 *या निर्णयांचा फायदा कोणाला?*
▪️ शेतकरी
▪️ शिक्षक व कर्मचारी
▪️ कोकणातील नागरिक
▪️ साहित्य संस्था
▪️ वैद्यकीय संस्था
▪️ विद्यार्थी
▪️ अनुसूचित जाती-जमाती घटक
━━━━━━━●━━━━━━━




















