आंबेगाव प्रवीण पप्पू शिंदे
प्रवक्ते विकास जी लवांडे यांच्या वरती साई फेक हल्ला व तसेच जीव घेणे हल्ला हा अतिशय दयनीय प्रकार वारकरी संप्रदायाचे प्रचारक संग्राम बापू भंडारे यांनी केल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र मध्ये खळबळ जनक घटना घडत असताना त्यांच्यावरती गुन्हे नोंद व्हावे यासाठी शिक्रापूर पोलीस चौकी या ठिकाणी निवेदन देऊन लोकशाहीच्या मार्गाने आपल्या भावना अनेक कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत प्रामुख्याने शिरूर हवेली युवक राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये शिक्रापूरचे एपीआय देशमुख साहेब यांना निवेदन देत असताना यामध्ये प्रामुख्याने शिरूर तालुक्याचे ज्येष्ठ नेते दत्ता हरगुडे संभाजी नाना भुजबळ सुरेश थोरात रमेश भुजबळ काकासाहेब चव्हाण आणि शिवले सोमनाथ रासकर अतुल दादा शिंदे सुदर्शन मिरची युवक अध्यक्ष बच्चुभाऊ गव्हाणे अशी बाई तांबोळी सुभाष भाऊ वडगुले बबलू भाऊ शिंदे व शिरूर हवेलीचे प्रवक्ते निलेश जगताप करंजे व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते यावेळेस अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या भावना या माध्यमातून व्यक्त केल्या यामध्ये सुरेश थोरात युवक अध्यक्ष बच्चु गव्हाणे व प्रवक्ते निलेश जगताप यांनी तीर्व शब्दात संग्राम भंडारे यांचा निषेध व्यक्त केला यावेळेस सुरेश थोरात म्हणाले की सध्या महाराष्ट्रामध्ये चालले काय संतांच्या आणि महाराज लोकांच्या तोंडामध्ये असे दादागिरीचे गुंडगिरी चे शब्द जर येत असतील तर हा महाराष्ट्र चाललाय कुठे? माझ्या शेतकऱ्याला साधा अंगामध्ये बनेल घेण्यासाठी पैसे नाही आणि महाराज लोकांच्या हातामध्ये गळ्यामध्ये सोन्याचे मौल्यवान वस्तू आपल्याला पाहायला मिळतात त्या कालखंडामध्ये संत गाडगेबाबा संत तुकडोजी यांनी गावांमध्ये जाऊन गावे स्वच्छ करून संध्याकाळी हरिकीर्तन करून भोळ्या भाबड्या लोकांना समाजाचे मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी प्रयत्न केला या घटनेचा त्यांनी जाहीर निषेध करून त्यांनी आपला पाठिंबा व्यक्त केला


















