आंबेगाव. प्रवीण पप्पू शिंदे
*दिनांक 13/05/2026 रोजी सांयकाळी 6:00 वाजता मंचर पोलीस स्टेशन हद्दीत मंचर ST स्टॅन्ड परिसरात एक पुरुष जातीचा अनोळखी इसम वय अंदाजे 55 ते 60 वर्ष उंची पाच फूट, अंगाने सडपातळ, रंग काळा सावळा, कपाळ उभट, नाक सरळ,अंगात निळसर चेक्स हाफ बाह्याचा शर्ट, निळ्या रंगाची पॅन्ट घातलेला इसम बेशुद्ध अवस्थेत मिळून आल्याने त्याला उपचार कामी उपजिल्हा रुग्णालय मंचर येथे दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले आहे.तरी सदर वर्णनाचे अनोळखी मयत इसमास कोणी ओळखत असल्यास किंवा मयत इसमा बाबत माहिती मिळताच मंचर पोलीस स्टेशन येथे संपर्क करावा.*
श्रीकांत कंकाळ ( PI )
मो. 9422432555
सनिल धनवे (PSI)
मो. 9850078100


















