आंबेगाव तालुक्यातील महा-ई सेवा केंद्रात होती नागरिकांची लूट ?
आंबेगाव. प्रवीण पप्पू शिंदे
मंचर. आंबेगाव तालुका येथील महा-ईसेवा केंद्रामध्ये नागरिकांची आर्थिक लूट केली जात असून,सर्व प्रकारचे शासकीय दाखले काढण्यासाठी आलेल्या नागरिकांकडून भिगवणमध्ये घेतली जाणारी फी पुढील प्रमाणे आहे.१)उत्पन्न दाखल्यासाठी २००/रुपये २) डोमासाईल दाखल्यासाठी २५०/ रुपये ३) जातीच्या दाखल्यासाठी ६००/ रुपये,४) नॉन क्रिमिलीअर साठी ५००/ रुपये,५)प्रतिज्ञा पत्रासाठी २००/ रुपये,६) नवीन आधार कार्ड अपडेट करण्यासाठी १००/ रुपये. अशा प्रकारे अधिकचे पैसे घेऊन नागरिकांची मोठ्या प्रमाणात पैशाची लूट करण्यात येत आहे. येथे आंबेगाव अनेक स्थानिक नागरिकांनी बोलून दाखवले की हे महा-ई सेवा चालविणारे दिवसाढवळ्या दरोडा टाकत असून सर्वसामान्य जनतेची लूट करीत आहेत. तसेच शाळेतील मुलांची कागदपत्रे काढण्यासाठी देखील आडवणूक करून अधिकचे पैसे घेतले जातात.अशी येथील नागरिकांनी बोलून दाखवले
