*
आंबेगाव. प्रवीण पप्पू शिंदे
मंचर. प्रकारचे शासकीय दाखले काढण्यासाठी आलेल्या नागरिकांकडून आंबेगाव मध्ये घेतली जाणारी फी पुढील प्रमाणे आहे.१)उत्पन्न दाखल्यासाठी २०० रुपये २) डोमासाईल दाखल्यासाठी २५० रुपये ३) जातीच्या दाखल्यासाठी ६०० रुपये,४) नॉन क्रिमिलीअर साठी ५०० रुपये,५)प्रतिज्ञा पत्रासाठी २००रुपये,६) नवीन आधार कार्ड अपडेट करण्यासाठी १०० रुपये. अशा प्रकारे अधिकचे पैसे घेऊन नागरिकांची मोठ्या प्रमाणात पैशाची लूट करण्यात येत आहे, आंबेगावमध्ये अनेक स्थानिक नागरिकांनी बोलून दाखवले की हे महा-ई सेवा चालविणारे दिवसाढवळ्या दरोडा टाकत असून सर्वसामान्य जनतेची लूट करीत आहेत. तसेच शाळेतील मुलांची कागदपत्रे काढण्यासाठी देखील आडवणूक करून अधिकचे पैसे घेतले जात असल्याची तक्रार येथील संख्या नागरिकांनी वेळोवेळी बोलून दाखवली आहे, त्यामुळे महा-ई-सेवा केंद्रांनी योग्य ती फी आकारूनच दाखले देण्याची व्यवस्था करावी अशी नागरिकांची मागणी आहे
