ज्ञानेश्वर पाटेकर
*एक ऑगस्ट पासून कार्यालयासमोर उपोषण व आत्मदहनाचा इशारा*
पुणे नगर राष्ट्रीय महामार्ग व व्हीआयपी एअरपोर्ट रस्ता सिद्धार्थ नगर रामवाडी मधील रस्ता बाधित नागरिकांचा स्वतःच्या हक्काच्या सदनिका मिळण्यासाठी गेली १८ वर्षापासून अविरतपणे सातत्याने संघर्ष सुरू असून या प्रयत्नाला गेल्या दोन महिन्यापासून खऱ्या अर्थाने यश मिळत असताना आज सिद्धार्थ नगर मधील रस्ता बाधितांनी रामवाडी येथील क्षेत्रीय कार्यालयाला घेराव घातला, गेली १८ वर्षापासून *कोणी घर देता का घर* या आशेने ऊन वारा पाऊस या समस्यांची अविरतपणे येथील रहिवासी संघर्ष करत असून शासनाच्या दप्तर दिरंगाई,नाकर्तेपणा आणि लाल फीतीच्या गलिच्छ कारभारामुळे या रस्ता बाधितांना कोणीही दाद दिली नाही, अनेक युवक वृद्ध महिलांनी या ठिकाणी आत्महत्या केल्या असून अनेक नागरिक या ठिकाणी गलिच्छ वातावरणामुळे रोगाचे बळी पडले आहेत, एकंदरीत मानसिक शारीरिक व आर्थिक अशा प्रकारची हानी येथे नागरिकांची झाली असून हा सर्व भाग विकासापासून वंचित राहिला आहे,अखेरीस महाराष्ट्र घर जमीन परिषदेचे संस्थापक अध्यक्ष एडवोकेट बी एम रेगे आणि संतुलन शेतकरी कष्टकरी महिला परिषदेचे अध्यक्ष एडवोकेट पल्लवी रेगे यांनी रस्ता बाधितांचे नेतृत्व करत त्यांच्या संघर्षाला अखेर न्याय देण्याचा प्रयत्न केला असून एक ऑगस्टपर्यंत सदनिकांचा ताबा न मिळाल्यास रामवाडी क्षेत्रीय कार्यालयासमोर आमरण उपोषण व आत्मदहनाचा इशारा उपअभियंता अशोक सांगळे व उपायुक्त शितल वाकडे यांना रस्ता बाधित नागरिकांनी दिला आहे याप्रसंगी माजी नगरसेवक राजू शिरसाठ, मीना ओझरकर, मीना हनचनमनी, मार्शल गायकवाड, उद्धव डोळस संतोष इनकर सुनील वडमारे संजय घोडके, प्रवीण ढसाळ,लक्ष्मीबाई तुरुककमारे,वनिता वडमारे, नंदा सोनवणे यासह रणजीत अवधूत, साहिल गायकवाड, आदित्य डोळस, साहिल जगदाळे, अक्षय वडमारे, बबलू शर्मा, ऋतिक गटवाळे, कविराज प्रधान यासह असंख्य नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
*चौकटीमध्ये घ्या*
*उपआयुक्तांचा बैठकीमध्ये वाकडेपणा*
*रामवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या उपायुक्त शितल वाकडे यांनी एडवोकेट बी एम रेगे आणि एडवोकेट पल्लवी रेगे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीमध्ये वाकडेपणामध्ये बोलून रस्ता बाधितांच्या प्रश्नाला वाकडी वाट दाखवल्यामुळे बैठकीमध्ये बाचाबाची झाली परिणामी अधिकाऱ्यांनी वेळेचे गांभीर्य ओळखून याप्रसंगी पोलिसांना पाचारण केले*.
