प्रवीण ( पप्पू) शिंदे
आंबेगाव तालुक्यामध्ये डिंबा प्रकल्प हा एक वरदान ठरलेला प्रकल्प आहे त्यामुळे तालुक्यामध्ये जलसिंचनाच्या सुविधा आणि सुबत्ता वाढलेली आहे या प्रकल्पामुळे बाधित झालेल्या व्यक्तींच्या पुनर्वसनासाठी जिथे उर्वरित प्रश्न प्रलंबित होते त्यासंदर्भात जमिनी संदर्भातले नागरी सुविधा संदर्भातले त्याचप्रमाणे त्या ज्या अडचणी निराकरण करण्यासाठी उर्वरित प्रकल्पग्रस्तांना अभिलेख मिळण्यासाठी उर्वरित प्रकल्पग्रस्ताचे प्रमाणपत्र काढण्यासाठी आवश्यक असणारे अभिलेख मिळावे ते मार्गस्थ व्हावे यासाठी दिलीपराव वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व माननीय जिल्हाधिकारी जितेंद्र ट्यूडी त्याचप्रमाणे अतिरिक्त जिल्हाधिकारी सुभाष मापारी उपविभागाचे प्रांताधिकारी गोविंद शिंदे,तहसीलदार संजय नागटिळक.नायब तहसीलदार, डॉ.सचिन वाघ,शांताराम किरवे
यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, याप्रसंगी तालुक्यातील पश्चिम भागातील प्रकल्पग्रस्त शेतकरी मोठ्या संख्येने हजर होते या शिबिराचा लाभ अनेकांनी घ्यावा आणि उर्वरित जे काही प्रकरण तयार होत आहे ते पूर्णत्वास नेण्यास प्रशासन सज्ज आहे असे आवाहन याप्रसंगी करण्यात आले
