आंबेगाव. प्रवीण पप्पू शिंदे
*३० जुलै २०१४ची पहाट माळीन तालुका आंबेगाव* येथील रहिवाशांसाठी मृत्यूचे तांडव घेऊन आली.निमित्त होतं पावसाचं.भूस्खलनाने गावाच्या पायथ्याशी असलेला डोंगर निसटला.सारा गाव घरं,माणसं, जित्राबं सगळं काही मातीखाली गाडली गेली
या प्रकोपाने माळीण गाव होत्याचं नव्हतं झालं.त्या मातीच्या अजस्त्र ढिगाऱ्याने आपलं उदरात सगळं गावच सामावून घेतलं.
१५१ निष्पाप माणसं आणि त्याहीपेक्षा अधिक पशुधन ह्यांना प्राण गमवावे लागले.
खबर मिळताच दिलीपराव वळसे पाटील हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले.सर्व शासकीय, प्रशासकीय,सामाजिक, राजकीय यंत्रणांशी समन्वय साधून तात्कालीक आणि दीर्घकालीन उपाययोजना करण्यासाठी वळसे पाटलांनी जातीने लक्ष घातले.
कुठल्याही भरपाईने ह्या हानीची पूर्तता होणं सर्वथा अशक्य होतं. पण गावकऱ्यांना मदतीचा हात पुढे करणे ही आपली जबाबदारी होती.
या घटनेतून वाचलेल्या गावकऱ्यांच्या दुःखात वळसे पाटील सहभागी झाले. त्यांच्या दुःखावर फुंकर घातली. त्या सगळ्यांना योग्य भरपाई मिळावी,मदत व्हावी, त्यांचे पुनर्वसन व्हावे, घरे मिळावीत या कामी वळसे पाटलांनी पुढाकार घेतला. आणि हे काम पूर्णत्वास जाईल ह्याची दक्षता घेतली.
आज या घटनेला अकरा वर्ष पूर्ण होत आहेत गावकऱ्यांच्या जखमा अजून पूर्ण भरल्या नाहीत भरणारही नाहीत.पण व्रण हळूहळू कमी होत आहेत.
या दुर्दैवी घटनेत जीव गमावलेल्या सर्वांना श्रद्धांजली वाहण्यासाठी जिल्ह्यातून अनेक नागरिक या ठिकाणी सहभागी झाले होते.
