आंनद करूडवाडे
सर्कल प्रतिनिधि रामतीर्थ
खऱ्या शिक्षकांची ओळख ही त्यांच्या विद्यार्थ्यांमुळे होत असते. रॉयल माणूस होण्यासाठी रियल जीवन जगावे लागते.अगदीच त्याप्रमाणे त्यांनी ओठात एक अन पोटात एक असे आतापर्यंत त्यांनी कधी वागलेच नाहीत. त्यांचा स्वभाव स्वच्छ आरसपाणी पाण्यासारखा वर पासून तर तळापर्यंत अगदी नितळ… त्यांच्या मनातला गडूळपणा कधी कोणाला दिसलाच नाही.विठ्ठल वाघमारे यांचा जन्म पिंपळगाव ता.नायगाव येथील खेडेगावात एका अशिक्षित शेतमजुरांच्या घरी झाला. तीन भावंडे आणि दोन बहिणी असा त्यांचा परिवार. लहानपणापासूनच अभ्यासाची आणि शिक्षणाची ओढ त्त्यांना स्वथ बसून देत नव्हती. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे ते प्यायलाच पाहिजे अशी धारणा विठ्ठल वाघमारे सर यांच्या मनाने दृढनिश्चय केला होता. शिक्षणाने माणूस ज्ञानी होतो आणि ज्ञानी माणूस हा परिपूर्ण शिक्षक असतो हे चांगले त्यांना ज्ञात होते म्हणून त्यांनी प्रथमतः पहिली ते चौथी गावच्याच जि प शाळेत पूर्ण केली तर पाचवी ते बारावी जनता हायस्कूल नायगाव येथे शिक्षण पूर्ण केले शरदचंद्र महाविद्यालय नायगाव येथे त्यांनी बीएची पदवी पूर्ण केले.नांदेडच्या यशवंत महाविद्यालय मध्ये त्यांनी एम ए पूर्ण करून अंबाजोगाई येथील अध्यापक महाविद्यालय येथे त्यांनी बी.एड ही शिक्षक पदवी पूर्ण करून श्री साई शिक्षण प्रसारक मंडळ खतगाव संचलित… शिवशंकर माध्यमिक वनाळी येथे त्यांनी प्रथमतः माध्यमिक शिक्षक म्हणून रुजू झाले आणि तीस वर्ष मराठी विषय शिकवतअविरतपणे सेवा केली. पूर्ण करून आज ते सेवानिवृत्त होत आहेत. त्यानिमित्त त्यांच्या कार्याचा घेतलेला हा अल्पसा परिचय.
विद्यार्थी हे माझे दैवत मी त्यांचा पुजारी ही खूनघाट मनाशी बांधून त्यांनी शैक्षणिक कार्य केले.म्हणून तर अनेक शिक्षक त्यांच्याशी बोलताना अगदी सहज बोलून जायचे विठ्ठल वाघमारे सर म्हणजे अगदी भोळा विठ्ठल ‘मनात कसली अडी नाही आतून कधी कडी नाही’ असं आतून बाहेरून मोकळं जीवन जगणं हे त्यांचे खास वैशिष्ट्ये.मराठी शिकवणे आणि त्यातल्या त्यात व्याकरण शिकवणे हा त्यांचा हातखंडा म्हणून दहावीच्या वर्गातील त्यांचे विद्यार्थी चांगल्या गुणांनुक्रमे उत्तीर्ण व्हायचे.त्यांचे अनेक विद्यार्थी चांगल्या चांगल्या पदावर आजही कार्यरत आहेत. त्यांच्या या उत्कृष्ट कार्याबद्दल महात्मा फुले जिल्हास्तरीय शिक्षक पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला.हे त्यांनी आतापर्यंत केलेल्या कार्याची पावती म्हणावी लागेल.अदबिन,मर्जीने आणि दुसऱ्यांचा मान राखून सदा चेहऱ्यावर हास्य ठेवून त्यांनी आपण तर आनंद घ्यायचा आणि दुसऱ्यालाही आनंद देण्यामध्ये त्यांना आनंद वाटायचा.त्यांच्या हातात कधी मी छडी पाहिली नाही पण त्यांची विद्यार्थ्यावर असलेली जरब आणि वचक ही वाखण्याजोगी होती.त्यांचा माझा सहवास तीन वर्षाचा असला तरी तीन तपाचा अनुभव मला त्यांच्यापासून मिळाला.मराठी विषयाचे जेष्ठ सहकार्य म्हणून त्यांचा वेळोवेळी सहभाग त्यांचं सहकार्य, मार्गदर्शन मी कधीही विसरू शकत नाही.शाळेतील आतापर्यंत त्यांनी सांस्कृतिक विभागाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली त्यांच्या अनुभवाचा मला नक्कीच फायदा होईल.ते आज शाळेतून सेवानिवृत्त होत असताना मराठी विषयाची जाण,भान आणि शान असणारे वाघमारे सर आता इथून शाळेत दिसणार नाहीत ही मनाला लागलेली हुरहुर ती कायमचीच असणार आहे… एक मन मिळाऊ ज्येष्ठ सहकारी जीव लावणारे, सुखदुःखाच्या क्षणी खंबीरपणे पाठीशी उभा राहणारे, आनंदाचे क्षणी सोबत राहणारे आणि संकटात पुढे असणारे.असे हरहुन्नरी व्यक्तिमत्व आज आमच्या शाळेत दिसणार नाहीत.. त्यांची जाणीव आणि उणीव आम्हाला नेहमीच राहणार आहे.असं विद्यार्थ्यांना,शिक्षकांना आणि गावातील लहान थोरांना हवहवसं व्यक्तिमत्व त्यांचं नसणं निश्चितच येणाऱ्या काळामध्ये त्यांची कमतरता निश्चितच जाणवेल.ते खेळाडूं नव्हते पण खिलाडू वृत्तीचे होते… ते कलावंत नव्हते पण अनेक कलावंताना घडवणारे होते… जीवनातल्या रंगमंचावर अनेकांना अनेक पात्र वठवण्यास भाग पाडणारे पडद्यामागचे खरे कलावंत आज तीस वर्षाची प्रदीर्घ सेवा अखंडपणे करून ते सेवानिवृत्त होत आहेत.यांचं मनाला खूप दुःख वाटत आहे. त्यांची जाणीव,उणीव नेहमीच भासणार आहे.अशा हरहुन्नरी व्यक्तिमत्वास विसरणे कसे शक्य आहे.सर इथून गेला तरी या विद्यालयात जागोजागी तुमच्या कर्तुत्वाच्या पाऊलखुना निश्चितच दिसतील. विद्यार्थ्यांना जीव ओतून शिकवणे, प्रत्येक काम तळमळीने आवडीने करणे हे त्यांचे खास,शाळेत जीव ओतून शिकवण माझ कर्म …. विद्यार्थी घडवणं हाच माझा धर्म.. उत्तम संस्कारा बरोबर शिकवण हे आपल कर्तव्य …. मानणारे विठ्ठल वाघमारे सर यांना पुढील आयुष्य सुख,शांती आणि आरोग्यदायी लाभो ही सदिच्छा…
अनेक निराकारांना तुम्ही
आयुष्यभर दिलात आकार
पण तुम्ही काळजावर कोरलेले
अमिट राहतील संस्कार…
बालाजी पेटेकर खतगावकर*
कलाध्यापक,श्री शिवशंकर माध्यमिक विद्यालय वन्नाळी ता. देगलूर 8975340777
