आंनद करूडवाडे
सर्कल प्रतिनिधि रामतीर्थ
देगलूर रुग्ण सेवा हे एक शुद्ध व पवित्र कार्य असून मागील ४८ वर्षा पासून गरीब रुग्णांना नाममात्र दरात वैद्यकीय सेवा पुरविण्याचे कार्य येथील रुग्ण सेवा मंडळा द्वारे केले जाते. डॉ.व्यंकटेश काब्दे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करणाऱ्या या संस्थेने आज पर्यत हजारो रुग्णावर मोती बिंदु शस्त्रक्रिया करून त्याचे जीवन प्रकाशमय करण्याचे कार्य अखंडपणे चालू ठेवले आहे. ग्रामीण भागातील रुग्णांना नाम मात्र दरात रुग्ण वाहिका पुरविणे, नेत्र तपासणी करणे व विविध शिबिराद्वारे दमा, रक्तदाब, शुगर यासारख्या आजाराने ग्रासलेल्या रुग्णाच्या जीवनात आनंद फुलविण्याचे कार्य ही संस्था अखंडपणे करीत आहे.
अलिकडे आरोग्य सेवेत फिजीओथेरेपी उपचारा करिता अधिक महत्व प्राप्त झाले असून रुग्ण सेवा मंडळाद्वारे समाजातीन दानशूर व्यक्तिंच्या सहयोगाने देगलूर शहरात भव्य दोन मजली ईमारत बांधकाम पूर्ण झाले आहे.अनत्याधुनिक जॉन्सन कंपनीची लिफ्ट देखिल बसविन्यात आली आहे. या भव्य ईमारती मध्ये अत्याधुनिक फिजिओथेरेपी सेंटर सुरु करण्यात आले असून रुग्ण सेवेला प्रारंभ करण्यात आला आहे.
रुग्ण सेवेसाठी डॉ. ज्योती पेटेकर यांची नियुक्ती करण्यात आली असुन नाममात्र दरात फिजिओथेरेपी सेवा देन्यात येत आहे.
प्रस्तुत अत्याधुनिक फिजिओथेरेपी सेंटरचा लाभ जास्तित जास्त रुग्णानी घावा, असे अवाहन संस्थेचे अध्यक्ष माजी खासदार डॉ. व्यंकटेश रुक्माजी काब्दे, उपाध्यक्ष देवेंद्र बालाजीराव मोतेवार, सचिव सूर्यकांत गोविंदराव नारलावार, सहसचिव प्रा. डॉ. बालाजी राजेशराव कत्तुरवार, कोषाध्यक्ष प्रा. विठ्ठल गुंडया चिंतावार कार्यकारी मंडळ सदस्य रामचंद्र किशनराव दाभडकर, डॉ. अजित व्यंकटेश काब्दे, मधुकर गोविंदराव नारलावार, लक्ष्मीकांत दिगंबरराव पदमवार, नंदकिशोर मनोहरराव दाशेटवार, रमेश राजेश्वरराव नारलावार, मारुती हजप्पा गायकवाड, मुरलीधर प्रल्हादराव वट्टमवार, विजय अनंतराव चालिकवार, व्यंकट मुकुंदराव कांबळे यानी केले आहे.
