आंनद करूडवाडे
सर्कल प्रतिनिधि रामतीर्थ
रामतीर्थ : खतगाव येथे
असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता भावठाणकर यांच्या प्रयत्नामुळे ४ वर्षात तब्बल ३६३ महिलांवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे.
बिलोली तालुक्यातील खतगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता भावठाणकर व त्यांच्या टीमने खतगाव परिसरातील कुटुंब नियोजनाचे महत्व सांगत गत चार वर्षापासून तब्बल ३६३ महिलांवर कुटुंब नियोजनाची यशस्वी शस्त्रक्रिया केली आहे. त्याच अनुषंगाने १८ जुलै रोजी दुपारी वैद्यकीय अधिकारी अशोक बेलखोडे यांनी खतगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी,आरोग्य सेविका व आरोग्य सेवक औषध निर्माण अधिकारी यांच्या सहकार्याने ३४ महिलांवर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया पूर्ण केली आहे. यावेळी खतगाव प्राथमिक केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता भावठाणकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. व्ही. डी. रामपुरे, सामुदायिक आरोग्य अधिकारी डॉ. ज्योती डावखरे, डॉ. नम्रता खानापुरे, आरोग्य सेविका गंगासागर मॅनेवार, विजयालक्ष्मी चोपवाड, अश्विनी डांगे, प्रतिक्षा भालेराव, राऊ इंगळे, रीना लोकरे, सोनाली चोंडे, माया चिंतले, वहीदा शेख, भारती कोटलोड व औषध निर्माण अधिकारी लक्ष्मण अनपलवार, अब्दुल खदीर, मारोती पेंटे, सायबु बाळके, आर. एम. बोधनकर, अशोक शकलोड, श्रीराम पाटील, अजित जाधव आदी कर्मचारी उपस्थीत होते.
