आंनद करूडवाडे
सर्कल प्रतिनिधि रामतीर्थ
रामतीर्थ: आदमपुर येथील महाळप्पा पटने विद्यालयास रामतीर्थ पोलीस ठाण्याचे नवनियुक्त सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम हराळे यांनी १७ रोजी दुपारी भेट दिली आहे. यावेळी विद्यार्थ्यांनी त्यांच्याशी संवाद साधला आहे. आदमपूर येथे इयत्ता आठवी ते दहावीपर्यंत महाळप्पा पटने विद्यालय आहे. यावेळी विद्यार्थ्यांशी सपोनि विक्रम हराळे यांनी संवाद साधत विद्यार्थी दशेतील आपल्या आठवणी सांगत महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी माजी सरपंच अंबादास शिनगारे, शाळेचे मुख्याध्यापक चंद्रशेखर लगडे, बिट जमादार रामचंद्र काळे, पोलीस कर्मचारी अशोक येरपलवार, संजय हालबुर्गे सह शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकत्तेर व विद्यार्थी उपस्थीत होते.
