आंबेगाव-प्रवीण शिंदे
आज दिनांक 17 7 2025 रोजी आंबेगाव तालुका ग्रामपंचायत अधिकारी युनियन डी एन ए 136 शाखा आंबेगाव च्या अध्यक्षपदी नव्याने अनिल टेमकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आंबेगाव तालुका ग्रामपंचायत अधिकारी युनियनच्या अध्यक्षपदी मावळते अध्यक्ष जयवंत मेंगडे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या अध्यक्ष पदासाठी आंबेगाव तालुका ग्रामपंचायत अधिकारी युनियनच्या आमसभे मध्ये आज अध्यक्ष तसेच संचालक पदाची निवड करण्याचे सभेत ठरले या कामी आंबेगाव तालुका ग्रामपंचायत अधिकारी युनियनच्या संचालक पदी श्री रवींद्र खंडारे श्री अशोक बाळसराफ तसेच श्रीमती योगिता दळे यांची संचालक पदी निवड करण्यात आली तसेच या आमसभेसाठी मावळते अध्यक्ष जयवंत मेंगडे सचिव मंगेश जोशी कार्यकारणीतील सर्व संचालक तसेच सर्व ग्रामपंचायत अधिकारी आंबेगाव तालुका उपस्थित होते
