आंनद करूडवाडे
सर्कल प्रतिनिधि रामतीर्थ प्रत
रामतीर्थ: बिलोली तालुक्यातील खतगाव येथील सौ. मंजुळाबाई माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेण्यासाठी परिसरातून ये-जा करणाऱ्या सर्व विद्यार्थिनीना शाळेतुनच देगलूर व बिलोली आगारातून मोफत एसटी पासचे प्राचार्य मारोती पिन्नलवार व उपप्राचार्य रमेश वासरे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. खतगाव येथील सौ. मंजुळाबाई माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात बिलोली तालुक्यातील आळंदी, अटकळी, टाकळी, आदमपूर, मिनकी, मुतन्याळ, मुतन्याळ, बुडूर, केसराळी, रामपूरथडी, हिप्परगाथडी व देगलूर तालुक्यातील शाहापुर वन्नाळी, वझरगा, कोटेकलुर, शेवाळा आदी गावातील विद्यार्थिनी खतगाव येथे असलेल्या शाळेत पाचवी ते बारावी पर्यंत शिक्षण घेण्यासाठी येत असतात. महाराष्ट्र शासनाने यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर’ योजनेंतर्गत बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थिनींना मोफत एसटी पास शाळेतच विद्यार्थिनींसाठी वाटप करण्याची व्यवस्था सुरू केली असल्याने त्या अनुषंगाने ने येथे येथे शिक्षण घेत असलेल्या जवळपास १८० विद्यार्थिनींना एसटी पासचे वाटप करण्यात आले. यावेळी प्राचार्य मारोती पिन्नलवार, उपप्राचार्य रमेश वासरे, शिवदास मठपती, प्रा. मधुकर देशमुख, प्रा. शुभम मठपती, रेखा इंगळे, सुजाता कदम, सरिता डोंगरे आदी उपस्थित होते.
