आंनद कुरुडवाडे
सर्कल प्रतिनिधि रामतीर्थ
रामतीर्थ : आदमपुर येथील माजी
सरपंच तथा राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे युवा कार्यकर्ते प्रभाकर पेंटे यांनी १७ जुलै रोजी अधिवेशन काळात मुंबई येथील मंत्रालयात कॅबिनेट मंत्री दत्ता भरणे यांची भेट घेत आपले गाव आदमपूर विकासासंदर्भात चर्चा करीत गावातील युवकांसाठी क्रीडांगण व मुस्लिम समाजाच्या विकासासंदर्भात जवळपास २ कोटी रुपये निधीची मागणी केलीआहे.आदमपूर येथील राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे युवा कार्यकर्ते तथा माजी सरपंच प्रभाकर पेंटे यांनी क्रीडांगण, मुस्लिम व मागासवर्गीय स्मशानभुमीसाठी संरक्षण भिंत, अल्पसंख्यांक वस्तीत अंतर्गत मजबुतीकरण करण्यासाठी रस्ते महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री दत्ता भरणे यांची मुंबई येथील मंत्रालयात भेट घेत मागण्यांचे निवेदन दिले. तसेच २ कोटी रुपयांच्या विकास निधीची मागणी केली. यावेळी माजी सरपंच प्रभाकर पेंटे, शिवदास हालबुर्गे, बसवंत बिद्राळे, गोविंद पेटेकर, नागेश प्याटेकर, संतोष भिंगे उपस्थीत होते.
