प्रवीण पप्पू शिंदे महाराष्ट्र प्रदेश राज्य . अखिल भारतीय माथाडीआणि ट्रान्सपोर्ट युनियन पहिली गोष्ट म्हणजे संभाजी हे नाव एकेरी नाही. संभा हे नाव एकेरी आहे आणि संभाजी हे नाव आदरार्थी आहे. छत्रपती ही पदवी लावण्याचा अधिकार राज्याभिषिक्त राजाला असतो, त्यांच्या नावाने काढण्यात आलेल्या एखाद्या संघटनेला छत्रपती ही पदवी लावणे हे आपणच आपल्या राजांचे अवमुल्यन केल्यासारखे होईल. दुसरी गोष्ट म्हणजे, महाराष्ट्रातील अनेक लोक आवडीने आपल्या मुलाबाळांची नावे शिवाजी, संभाजी अशी नावे ठेवतात. म्हणून त्या प्रत्येकाला “छत्रपती” हे नाव लावण्याची बळजबरी करायची का? संघटना ही अशाच व्यक्तींची बनलेली असते. एकप्रकारे ती समाजाचे मूलच आहे. तिसरी गोष्ट म्हणजे, महाराष्ट्रात शिवाजी नगर, संभाजी नगर अशीही गावांची नावे आहेत. ही गावेही अनेक व्यक्तींची बनलेली असतात. म्हणजे त्या गावात राहणारे लोक महाराजांचा अनादर करतात असा होत नाही. चौथी गोष्ट म्हणजे, संभाजी ब्रिगेडचे नाव छत्रपती संभाजी ब्रिगेड करायला काही हरकत नाही, पण कुठलीही संस्था नोंदणी करण्यासाठी ज्या धर्मादाय आयुक्त कार्यालयातून कायदेशीर प्रक्रिया करावी लागते, त्यांच्या नवीन नियमांनुसार महापुरुषांच्या नावाने संघटनांचे रजिस्ट्रेशन करणे, नावात बदल करणे या गोष्टी शक्य नाहीत. पाचवी गोष्ट म्हणजे, जरी संभाजी ब्रिगेडचे नाव बदलून छत्रपती संभाजी ब्रिगेड असे केले, तरी “तुमच्या स्वतःच्या संघटनेला छत्रपती पदवी लावण्याचा काय अधिकार आहे?” असा जाब विचारणारेही लोक कमी नाहीत. असे लोक धड स्वतःही संघटना चालवत नाहीत आणि दुसऱ्यांनाही चालवू देत नाहीत. यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की संघटनेच्या नावावरुन किस पाडत बसण्यापेक्षा, संघटना करत असलेले काम सुद्धा बघा. संभाजी ब्रिगेड जे काही करते, ते सगळं महाराजांच्या आदरासाठीच करते. छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास पुढे आणणे असो, त्यांच्या बदनामी विरोधात रस्त्यावर उतरून संघर्ष करणे असो, त्यांची जयंती साजरी करणे असो, बिडीला दिलेले त्यांचे नाव हटवण्यासाठीचा संघर्ष असो, त्यांच्या नावाचा राष्ट्रपुरुषांच्या यादीत समावेश करण्याचा लढा असो, इत्यादी अनेक बाबतीत संभाजी ब्रिगेडच सर्वात पुढे आणि आग्रही असल्याचे दिसून येईल. छत्रपती संभाजी महाराज हे आमचे बाप आहेत. आणि आमच्या बापाचे नाव आम्ही काय घ्यायचे आणि काय नाही, हे ठरवायचा अधिकार कुठल्याही बांडगुळांना नाही.. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे!
