आनंद कुरुडवाडे
बिलोलो प्रतिनिधि
पन्हाळगडाच्या परिसरामधील मुलखात शिवा काशीदची लोककथा गेली साडेतीनशे वर्षे, पिढ्यान् पिढया सांगितली गेली आहे. कोण होता हा शिवा काशीद? पन्हाळयाच्या पायथ्याशी, पूर्व बाजूवर, नेबापूर गांव आजही आहे. शिवा काशीद हा त्या गावचा नाभिक शिवा काशीद यांचा जन्म ५ मे १६३० रोजी नेबापूर या गावी झाला. नाभिक समाजातील मंडळी जात्याच चतुर, बहुश्रुत व बातम्या काढण्यात तरबेज मानली जात. शिवा काशीद तर हा कलेत भलताच निपूण होता. महाराजांनी पहिल्यांदा पन्हाळ जिंकून घेतला आणि त्याच वेळी शिवा काशीद त्यांच्या नजरेत आला. महाराजांनी त्यांच्या अंगचे गुण पाहून त्याची हेरखात्यात नेमणूक केली.लवकरच पन्हाळगडास सिद्दी जोहरचा वेढा पडला. सर्व बाजूंनी वाटा रोखल्या गेल्या. गड जेर झाला. महाराज मोठ्या संकटात सापडले. जोहरला कसा चकवा द्यावा, याचा मनाशी विचार करू लागले. विचारमग्न असताच त्यांच्या मनात एका युक्तीची कल्पना चमकून गेली. युक्ती नामी होती. कारभाऱ्यांशी सल्ला मसलत होऊन एक मसलत उभी राहीली. जोहरशी शरणागतीच्या वाटाघाटी सुरू करून शत्रूस गाफील करायचे. अन् रात्रीच्या अंधारात पन्हाळगडाहून निसटून विशाळगडाकडे जायचे पण त्याचवेळी शिवाजीराजांचे सोंग घेऊन कुणास तरी पालखीत बसवून नेहमीच्या वाटेने पाठवायचे शिवाजीराजा निसटून जाण्याच्या वेळी शत्रू सावध होऊन पाठलागास आला तर नेहमीच्या वाटेने जाणारी पालखी पकडली गेली तर शत्रू चकणार होता. काही काळ तरी शिवाजीराजा पकडल्याचा भ्रमात राहणार होता. दरम्यान शिवाजीराजा वेडा पारा होऊन विशालगडाकडे पसार होणार होता. मसलत ठरली खरी, पण खरी अडचण होती ती राजाचे सोंग द्याचे कोणाला! गडावरील सेवकांत महाराजांची नजर शोध घेऊ लागली.
महाराजांना हवा होता एक बाडसी हरहुन्नरी, हुशार संभाषण कलेत चतुर व अभिनय कलेत तरबेज सेवक! आणि त्याहून महत्वाचे म्हणजे त्यांच्या रूपाचा व त्यांच्या अंगकाठीचा सेवक सोंग घेतले तर खरा शिवाजीराजा वाटावा अशा शिवाजीराजाचा शोध चालू झाला आणि महाराजांची नजर आपल्याच सेवेत असलेल्या शिवा काशीदवर खिळली. शिवा नावानेच नव्हे तर रूपाने व अंगकाठीनेही ‘शिवाजीराजांस” शोभणारा वाटला याला शिवाजीराजा केले तर शत्रू हमखास चकेल याची खात्री महाराजांना वाटली. तेव्हा त्याला एकांती बोलावणे गेले. मसलत सांगितली गेली बोके समोर मांडले गेले वेळ आली तर मृत्यूला कवटाळणारा शिवा महाराजांना हवा होता. तो त्यांना मिळाला. शिवा काशीदने आनंदाने व उत्फूर्तपणे साथ दिली. मराठी राजासाठी मृत्यूशी झुंज द्यायला तो तयार झाला. आषाढाचे दिवस पन्हाळयाचा मुसळधार पाऊस, काळाकुट्ट अंधार व अवघड निसरड्या डोंगर वाटा,अशा परिस्थीत रात्रीचा एक प्रहार उलटून गेल्यावर पन्हाळ्यांच्या दोन पालख्या बाहेर पडल्या. दोन पालखीत दोन शिवाजीराजे एकीत खरा तर दुसरीत खोटा. शिवाजीराजांचे सोंग घेतलेला दोन्ही पालख्यांबरोबर सशस्त्र सैनिकांचा लवाजमा गडाबाहेर पडताच खऱ्या शिवाजीराजांची पालखी आडवाटेस लागली तर खोटया शिवाजीराजांची पालखी नेहमीच्या रस्त्याने पुढे जाऊ लागली. सर्वत्र गडद अंधार, त्यातच धुव्वांबार पाऊस कोसळत होता. पण त्याही परिस्थितीत गडाच्या बाहेर पडणाऱ्या वाटांवरील चौक्या जाग्या होत्या. वाटांवर लक्ष ठेवून होत्या.एक पालखी अंधारातून पुढे पुढे सरकताना त्यांना दिसली आणि सावजावर झडप टाकाली तशी चौकीमधल्या शत्रू सैनिकांनी तिला घेरली. शत्रूच्या हातावर तुरी देऊन निसटणाऱ्या ‘शिवाजाराजा “स त्यांनी पकडले होते. आनंदाच्या या बेहोषीतच त्यांनी राजांस त्यांच्या पालखीसह जोहरच्या गोटात आणले व त्यांच्यासमोर उभे केले. जोहरच्या छावणीत आनंदीआनंद पसरला. शिवाजीराजांच हाती आल्याने आदिलशाही मोहिमेची फत्ते झाली होती. अफझलखानास ठार करणारा, रूस्तुम झमानास पळवून लावणारा खुद्द राजा शिवाजी जोहरसमोर उभा होता. राजाला शोभेल अशा ढंगाने बोलण्याचा चालण्याती अदाकारी अशी की खरा शिवाजीराजांच वाटावा. शिवा काशीदने सोंग हुबेहुब वठविले होते. पण हे नाटक फार वेळ चालले नाही.जोहरच्या गोटातही चाणाक्ष माणसे होती. रूस्तुम झमानसारखे प्रत्यक्ष शिवाजी महाराजांकडून मार खाऊन पळालेले अधिकारीही होते. त्यापैकी कुणाला तरी संशय आला. हा खरा शिवाजीराजा नसावा. संशय बळावत गेला आणि मग कसून चौकशी सुरू झाली. शिवा काशीदचे सोंग उघडे पडले. क्षणार्धात जोहरच्या छावणीतील वातावरण बदलून गेले. आनंद व उत्साह यांची जागा निराश व संताप यांनी घेतली. शिवाजाराजांचा ठावठिकाणा शोधून काढण्यासाठी शिवा काशीदला मारहाण सुरू झाली. पण तो शत्रूस काहीच माहिती द्यायला तयार नव्हता. जो मृत्यूला भिंत नव्हता तो जोहरच्या सैनिकांस काय घाबरणार शेवटी शिवास एका खांबास बांधले गेले. भालाईत सैनिकांचे कडे भोवताली तयार केले गेले.जोहरने शिवास निर्वाणीचा इशारा देऊन पाहिला. पण शिवा काशीद शिवाजीराजा विषयी व शब्दही काढावयास तयार नव्हता. अखेर जोहरने हुकूम दिला. शिवा काशीदचा शेवट करण्याचा हुकूम त्यासरशी जोहरच्या सैनिकांपैकी एकाने पुढे होऊन शिवाच्या छातीत भाला मारला. खांबाशी बांधलेला शिवा प्राणांतिक जखमी होऊन खाली घसरत बसला आणि जिव जाण्यापूर्वी उद्गारला. ‘मी शिवाजीराजांचे सोंग घेतले.” पण हा सोंग घेतलेला शिवाजीराजा सुध्दा मरताना शत्रूस पाठ दाखविणार नाही. मग खऱ्या शिवाजीराजांची गोष्टच सोडा. तो दिवस होता १३ जुलै १६६० एका मराठेशाहीसाठी नाभिक समाजाच्या वीर पुरूषांचे बलिदान !
गोविंद पिंपळगांवकर
राष्ट्रीय अध्यक्ष
अखिल भारतीय जिवा सेना
मो. नं. ९३२५३२१९५४
