सुधीर जाधव
तालुका प्रतिनिधी, सातारा.
सातारा : दि. ७ सातारा सज्जनगड येथील सतत वाहतूक असणाऱ्या रस्त्यावर वृक्ष कोसळला यामुळे काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली. संततधार पाऊस पडत असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर जमिनीची धूप होत आहे. एक सारख्या पडणाऱ्या पावसामुळे जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता संपली असून, दल दल सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे हलक्या स्वरुपात वारा सुटला तरी मोठ मोठी झाडे उन्मळून पडण्याची स्थिती निर्माण झाली आहे. सातारा सज्जनगड रस्ता हा सतत वर्दळीचा रस्ता आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूस मोठमोठे जुनाट झाडे आहेत. सज्जनगड, ठोसेघर, उरमोडी धरण केळवली, सांडवली, भांबवली, पवनचक्क्या यासारखे पर्यटन स्थळ, धार्मिक स्थळ, धबधबा पाहण्यासाठी, त्याच बरोबर या विभागातून शहरात कामावर जाणारे, बाजारला खरेदी विक्रीसाठी जाणारे लोक, शाळा कॉलेजला जाणारे विद्यार्थी यांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते, असे धोकादायक वृक्ष वाटेत अचानक कोसळल्यास कोणताही मोठा अपघात घडू शकतो. रात्री घडलेल्या घटनेत कोणतेही अपघात घडला नसला, तरी यापुढे असा प्रसंग घडू नये, म्हणून मोठं मोठ्या वृक्षांची फांदी छाटणी करून अपघातही टाळता येतील आणि झाडही वाचवता येतील, असे उपाय करणे गरजेचे आहे. अशी स्थानिकांच्या कडून प्रतिक्रिया मिळाली.
