सुधीर जाधव
तालुका प्रतिनिधी, सातारा.
सातारा : दि. २५ साताऱ्यातील समस्यांबाबत मांडली व्यथा ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा ताण, मात्र साताऱ्यातील सर्व स्तरातील समस्यांचा आढावा घेऊ – पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना भेटण्यासाठी सातारा तालुका पत्रकार संघाचे पदाधिकारी गेले असता, त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. त्याच प्रकारे साताऱ्यातील विविध समस्या याच्याबाबत सातारा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अजय कदम व पदाधिकारी यांनी विविध विषयांवर चर्चा केली. मात्र पोलिस अधीक्षक यांनी सांगितले की सध्या सातारा जिल्ह्यात प्रवेश केलेल्या ज्ञानेश्वर माऊली पालखी बंदोबस्ताचा ताण खूप प्रमाणात आहे. तरी येत्या काही दिवसात वाढत्या घरफोडी विषयी विशेष ग्रामसभा घेऊन लोक जागृती करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच त्यांच्या सेवाकाळामध्ये विविध प्रसंगांविषयी उलगडा करून त्यांनी सांगितला. सातारा तालुका पत्रकार संघास पोलीस प्रशासनाचे सर्वतोपरी सहकार्य राहील, असे आश्वासन दिले. यावेळी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अजय कदम, कार्याध्यक्ष बाळू मोरे, खजिनदार वसंत साबळे, ज्येष्ठ मार्गदर्शक शिवाजी कदम, दैनिक ऐक्यचे मिलिंद लोहार, दैनिक सकाळचे प्रशांत सकुंडे, दैनिक प्रभातचे संतोष यादव, महाराष्ट्र न्यूजचे निलेश साबळे, दैनिक पुढारीचे सोमनाथ राऊत, निलेश रसाळ आदी तालुका संघाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
