सचिन संघई
जिल्हा प्रतिनिधी वाशिम
वाशिम :- अनसिंग येथील श्री.प.दी जैन कला महाविद्यालय अनसिंग राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने एक पेड मा के नाम 2.0 या राज्यस्तरीय उपक्रमांतर्गत महाविद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम राबविण्यात आला. शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक डॉ. पंकज शर्मा आणि सेवक श्री. सुनील वराडे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजनेचे क्षेत्रीय समन्वयक डॉ. बनचरे सर यांनी पर्यावरणाच्या समतोलासाठी प्रत्येकाने एक वृक्ष लावण्याचे आवाहन केले. त्याचप्रमाणे डॉ. बिचेवार सर यांनी भावी पिढीच्या उज्वल भविष्यासाठी वृक्षारोपणाचे महत्त्व विशद केले. याप्रसंगी कार्यक्रमाधिकारी प्रा.राठोड यांनी पर्यावरणाच्या समतोलासाठी वृक्षारोपण कार्यक्रमाला चळवळीचे स्वरूप प्राप्त होणे गरजेचे असल्याचे नमूद केले. सदर वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाला राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा.राठोड डॉ. बिचेवार डॉ.बनचरे डॉ.घोडेकर डॉ. शर्मा श्री. विनेश डहाळे श्री. अवस्थी श्री सुनील वऱ्हाडे हे उपस्थित होते.
