ज्ञानेश्वर पाटेकर
*पंढरीशी जारे आल्यानो संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग* या संत तुकाराम महाराजांच्या अभंगाप्रमाणे गेल्या 30 वर्षापासून केसनंद तालुका हवेली येथून जोगेश्वरी प्रासादिक दिंडीची केसनंद ते पंढरपूर अशी अखंडित पायी वारीची परंपरा सुरू असून दिंडीचे हे ३१ वे वर्ष आहे,जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या रथाच्या मागे दिंडी क्रमांक ५८ मध्ये दरवर्षी या दिंडीचा क्रमांक असतो, गावचे ग्रामदैवत श्री जोगेश्वरी मातेस अभिषेक करून श्री काळभैरवनाथ मंदिरापासून ग्राम प्रदक्षिणा करून दिंडी कोलवडी थेऊर मार्गे लोणी काळभोर मुक्कामी विसावली, दिंडीचे प्रस्थान होण्यापूर्वी स्वच्छ वारी सुंदर वारी ही संकल्पना राबवत माजी सरपंच प्रमोद हरगुडे व सामाजिक कार्यकर्ते अनिल जाधव यांसकडून वारकऱ्यांची वारीमध्ये होणारी गैरसोय टाळण्यासाठी फिरते शौचालय भेट देण्यात आले, तसेच एक सात ग्रुप केसनंद यांच्याकडून सलग तिसऱ्या वर्षी वारकऱ्यांसाठी उन्हाळी टोप्यांचे वाटप व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माजी सभापती सारिका हरगुडे व माजी सरपंच मिलिंद हरगुडे यांच्याकडून व शिरूर हवेली चे आमदार माऊली कटके यांच्याकडून रेनकोट वाटप करण्यात आले, केसनंद मधील अनेक दानशूर व्यक्तींनी आपल्या दातृत्वाचे दर्शन घडवत टेम्पो, पिकप वारीसाठी मोफत दिले असून वारकऱ्यांसाठी फराळ व अल्पोपहार वाटपाचे नियोजन ठिकठिकाणी करण्यात आले होते. सामाजिक धार्मिक शैक्षणिक क्षेत्रांमध्ये नेहमीच अग्रेसर असणाऱ्या केसनंद मधील एक सात ग्रुप कडून सलग तिसऱ्या वर्षी वारकऱ्यांचे उन्हापासून संरक्षण व्हावे या हेतूने उन्हाळी २०० टोप्यांचे वाटप करण्यात आले असून यापूर्वी या ग्रुप कडून रेनकोट, शबनम पिशवी, छत्री अशा विविध उपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले आहे, यापुढेही ही परंपरा अशीच चालू ठेवण्याचे प्रतिपादन ग्रुप कडून करण्यात आले असून याप्रसंगी ग्रुपचे अध्यक्ष सुरेश हरगुडे, उपाध्यक्ष बाळासाहेब हरगुडे, खजिनदार विजय हरगुडे पाटील, सदस्य माजी सरपंच मिलिंद हरगुडे, उद्योगपती दिलीप हरगुडे, सतीश ढवळे, बाळासाहेब तु. हरगुडे, महेंद्र हरगुडे, सुभाष हरगुडे, पत्रकार ज्ञानेश्वर पाटेकर, हसन शेख, मुकुंद हरगुडे, संतोष कोल्हे, ज्ञानेश्वर गावडे हे सदस्य उपस्थित होते.
