प्रविण पप्पू शिंदे
जिल्हा प्रतिनिधी पुणे
पिंपरी येथे अखिल भारतीय माथाडी आणि ट्रान्सपोर्ट युनियन या प्रतिनिधींची बैठक दि. १६ जुन रोजी संपन्न झाली. बैठकीमध्ये राज्यभर अखिल भारतीय माथाडी आणि ट्रान्सपोर्ट युनियन च्या वतीने आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी कॉ शंकर पुजारी होते.
महाराष्ट्र शासनाने नुकतेच राज्यातील ३० लाख जनतेसाठी घर बांधणी योजना पूर्ण करणार म्हणून जाहीर केलेली आहे परंतु प्रत्यक्षात बांधकाम कामगारांच्यासाठी नऊ हजार कोटी रुपये उपकर मंडळाकडे शिल्लक असून सुद्धा बांधकाम कामगारांचे घर बांधण्याचे अनुदानाचे अर्ज मात्र अजिबात मंजूर केले जात नाहीत व घर बांधण्यासाठी बांधकाम कामगारांना अनुदान दिले जात नाही. तसेच घर अनुदान मिळण्यासाठी संबंधित बांधकाम कामगार मागील तीन वर्षाचा सभासद असणे अशी जाचक अट महाराष्ट्र शासनाने ३० नोव्हेंबर २०२४ रोजी केलेली आहे. त्यामुळे ही अट त्वरित रद्द करून एक वर्ष नोंदणी असल्यास घर मागणी अर्ज मंजूर करावेत अशी मागणी करीत आहोत.
माझी कामगार मंत्री श्री सुरेश खाडे यांनी सहा महिन्यापूर्वी बांधकाम कामगारांना ते या मंडळाचे अध्यक्ष असताना मंडळाचा निर्णय जाहीर केला होता की प्रत्येक नोंदणीकृत बांधकाम कामगारस ५००० रुपये सानुग्रह अनुदान ( बोनस) देण्यात येईल. हे शासनाने वचन दिल्यानुसार पूर्तता करण्यात यावी.
महाराष्ट्र शासनाने नुकतेच बांधकाम कामगारांच्या साठी एक बोगस पेन्शन योजना जाहीर केलेली आहे. त्यांच्या निर्णयानुसार बांधकाम कामगारस निवृत्ती झाल्यानंतर पंधरा वर्षे ७५ वर्षानंतर पेन्शन मिळणार. ७५ वर्षानंतर बांधकाम कामगार जिवंत राहतो का?ही जगात कुठेही नसलेली भोंगळ पेन्शन योजना महाराष्ट्रामध्ये लागू केली आहे म्हणूनच या अटी रद्द करून एक वर्ष ज्यांची नोंदणी असेल त्यांच्या साठ वर्षानंतर दरमहा पाच हजार रुपये पेन्शन मिळाले पाहिजे. तसेच महाराष्ट्रातील लाखो सर्व प्रलंबित अर्ज त्वरित मंजूर केली पाहिजेत.
ज्या जिल्ह्यांमध्ये अद्यापही भांडी वाटप व पेटी वाटप सुरू झालेली नाही त्या ठिकाणी ते सुरू झाले पाहिजे इत्यादी मागण्यांच्यासाठी. संपूर्ण राज्यांमध्ये प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालय व संबंधित शासकीय अधिकारी कार्यालयावर बांधकाम कामगारांनी हजारोंच्या संख्येने मोर्चे काढून निदर्शने करून आंदोलन करावे असे असा निर्णय अखिल भारतीय माथाडी ट्रान्सपोर्ट युनियन च्या बैठकीत घेण्यात आला बैठकीमध्ये दिपक म्हेत्रे,संदेश कांबळे,कांचन वाघमारे,क्रांती साबळे,विशाल शिरसाट,ऋषीकेश बिडवई,ऋषी बाबर,राजेंद्र कदम, अश्विनी गटकळ, कल्याण गटकळ, संघमित्र नरवडे , मोहम्मद मनियार, रमेश नितनवरे, प्रवीण पप्पू शिंदे- भारतीय माथाडी आणि ट्रान्सपोर्ट युनियन, महाराष्ट्र प्रदेश राज्य सचिव. इत्यादीनी बैठकीत मते मांडली.
