आंबेगाव प्रवीण पप्पू शिंदे
आज १२ मे २०२६, माझी पत्नी डॉ. मनीषा जोशी यांचा वाढदिवस. एका पतीसाठी आपल्या पत्नीला देण्यासारखी भेट वस्तू देण्यासारख्या असू शकतात, पण ज्या वेदनेतून आणि अन्यायातून ती गेली आहे, त्यासाठी ‘न्याय’ हीच तिच्यासाठी सर्वोत्तम भेट ठरेल, अशी माझी धारणा आहे.
साहेब, आपलं आणि माझं नातं ३० वर्षांचं आहे; यात मतभेद झाले, सोबत कामही झालं. पण आज मी एका विशिष्ट घटनेकडे आपलं लक्ष वेधत आहे, ज्याने आमच्या आयुष्याची २० वर्षे उद्ध्वस्त केली.
काय आहे हे प्रकरण?
प्रदीप देहडकर याने २००३ मध्ये हॉटेल गंधर्व येथे मनीषाला बोलावून आपल्या ( तुमच्या नावाचा दहशतीने ) नावाचा गैरवापर केला.
तिला ‘भास्कर जोशींपासून घटस्फोट घे, नाहीतर तुला आणि त्याला संपवून टाकू’ अशी धमकी तुमच्या नावाचा दबाव वापरून दिली गेली. बद्दलचे सर्व पुरावे तुम्हाला अनेक वेळा दिले आहेत.
यात मनशक्ती केंद्र (तुमचे दोन विश्वस्त प्रमोद शिंदे आणि गजानन केळकर ) प्रदीप देहडकर आणि श्याम जोशी ( माझे सखे बंधू ज्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाच्या केबिनमध्ये बसून या सर्व संघटित गुन्हेगारीला कायदेशीर सपोर्ट केला ) यांसारख्या प्रवृत्तींनी संघटित होऊन एका सुशिक्षित महिलेचे आयुष्य, करिअर आणि आमचे घर उद्ध्वस्त करण्याचे कारस्थान रचले. केवळ राजकीय दबावापोटी आणि चुकीच्या माहितीच्या आधारे आम्हाला बेघर करण्यात आले. तेव्हा आर आर पाटील यांचे पीए बाळासाहेब कोळेकर जे सध्या शिर्डीचे उपजिल्हाधिकारी आहेत हे मनशक्तीचे मंत्रालयामध्ये दलाल म्हणून काम करत आहेत आणि आमच्या वृत्त दहशतवादी प्रत्येक करत आहे त्याची पुरावे तुम्हाला मिळाले तर तुम्ही त्याची हकालपट्टी केली.
साहेब, तुम्ही एकमेव नेत्यात की ज्यांच्या आमच्याबद्दल प्रचंड गैरसमज झाले नंतर मात्र तुम्ही जेव्हा आमचे पंतप्रधान कार्यालय, सीबीआय आणि सर्वोच्च न्यायालय सर्व पुरावे पाहिल्यानंतर तुमचे आमच्याबद्दलचे मत बदलले आणि प्रत्येक भेटीच्या वेळेस तुम्ही आम्हाला काळजीपूर्वक विचारपूस केली.
माझी आपल्याला कळकळीची विनंती:
अलीकडेच विलास लवांडे यांच्यावर झालेल्या शाईफेकीच्या घटनेनंतर आपण तत्काळ मुख्यमंत्र्यांना फोन करून गांभीर्य दाखवले, ते पाहून आमची आशा पल्लवीत झाली आहे. एका कार्यकर्त्यासाठी आपण जर इतक्या तत्परतेने धावून जात असाल, तर २० वर्षे अन्यायाशी लढणाऱ्या एका महिलेला न्याय का मिळू नये? ते सुद्धा जिथे तुमच्या नावाचा थेट दुरुपयोग करून एका महिलेला कायमचे बरबाद केले गेले आहे.
शिवाय 6 महिन्यापूर्वी डॉक्टर मनीषा जोशींवर तिच्या शेजाऱ्यांनी हल्ला (हल्लेखोर नितीन मुखेडकरचा दोनच दिवसापूर्वी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले आहे) केला तेव्हा तुम्ही तुमच्या PA रानडे मार्फत छत्रपती संभाजी नगरच्या सिडको पोलिसांना फोन केला होता. 15 डिसेंबर 2009 ला जेव्हा भाजपच्या लोकांनी हल्ला केला तेव्हा सुद्धा तुम्ही तेव्हाचे आयुक्त श्रीकांत सावरकर यांना आणि तत्कालीन गृहमंत्री यांना फोन केला होता. म्हणजे प्रत्येक वेळेस तुम्ही शक्य तेवढा प्रतिसाद दिलेला आहे.
जरी त्यावेळेस पूर्ण न्याय किंवा नुकसान भरपाई मिळाली नाही किंवा आमचे घरदार संपत्ती प्रॉपर्टी परत मिळाली नाही तरी आम्ही दोघे तुमचे आभारी आहोत. कारण तुम्ही किमान प्रयत्न तरी केला, मात्र सोनिया गांधी, उद्धव ठाकरे आणि गोपीनाथ मुंडे या सर्वांनी आम्हाला अक्षरशः टाळले, बाकी नातेवाईकांनी वाळीत टाकले. 2017 मध्ये जेव्हा ती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांना भेटायला गेली तर त्या आपल्या केबिनमध्ये लपून बसल्या कारण त्या प्रदीप देहेडकर च्या ओळखीच्या आहेत म्हणून त्यांनी त्याला वाचवले. मागील 36 महिन्यापासून आम्ही भयानक अवस्थेत जगत आहोत आणि सध्याचे मुख्यमंत्र्यांनी आमची अजिबात दाखल केली नाही त्यांना सर्व पुरावे दिल्यानंतर देखील.
वीस वर्ष एक ब्राह्मण हिंदू मराठी कुटुंबातील ज्ञानेश्वरीवर प्रवचन करणारी एमडी आयुर्वेद डॉक्टर केवळ तिने माझ्याशी लग्न केले म्हणून भीक मागून जगली आहे. ही गोष्ट संपूर्ण महाराष्ट्राला लांचनास्पद आहे. तिच्याकडे स्वतःचे घर नाही, तिची रोजी रोटी चा हक्क हिसकावून घेतला गेला आहे.
वडिलांचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर तिच्या वडिलांचे 35 लाख रुपये प्रॉव्हिडंट फंडाचे तिच्या नातेवाईकांनी लुटले, सर्वात कहर म्हणजे तिचे नातेवाकांनीच तिला घटस्फोटाची ऑफर दिली. ही सर्व हिम्मत लोकांमध्ये आली कारण मनशक्ती ते मंत्रालय लोबीने तुमच्या नावाचा पद्धतशीर दुरुपयोग केला.
तुम्ही ॲक्शन घेईपर्यंत आम्हाला परमनंट डॅमेज निर्माण झाला होता. आम्ही आत्महत्या केली नाही कारण आमचा अध्यात्म तत्त्वज्ञानावर दृढ विश्वास आहे आणि आमचा संकल्प खूप स्ट्रॉंग आहे. स्वामी विज्ञानानंदांच्या शक्तीने आम्हाला कायम मार्गदर्शन केले म्हणूनच आम्ही या वयात देखील आंतरराष्ट्रीय दर्जाचे संशोधन करू शकतो.
पवार साहेब, आज मनीषाच्या वाढदिवसानिमित्त मी आपल्याला हेच आवाहन करतो की:
आपण स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांना फोन करावा किंवा पत्र लिहावे.
प्रदीप देहडकर, मनशक्ती केंद्र आणि या संपूर्ण कटात सामील असलेल्या लोकांवर संघटित गुन्हेगारी (मोका – MCOCA) अंतर्गत गुन्हे दाखल करण्याचे निर्देश द्यावेत.
ज्यांनी तुमच्या नावाचा नव्हे तर संपूर्ण नेटवर्क आणि गुडविल आणि यंत्रणाचा खोटा वापर करून एका महिलेला मानसिक आणि सामाजिकदृष्ट्या संपवले तिचा रोजी रोटीचा हक्क हिसकावून घेतला आणि तिला महाराष्ट्रातून हाकलून दिले गेले. सर्व पुरावे तुम्हाला वेळोवेळी दिलेले आहेत. त्यांना कायद्याचा धाक दाखवावा.
साहेब तुम्ही कायमच मनिषाच्या संशोधनाचे आणि तिने जे धैर्याने लढाई दिली आणि माझ्याशी ती एकनिष्ठ राहिली या पद्धतीचे कौतुक केले आहे. तुम्ही तिला म्हणायचे की “मनीषा जी, तुम्ही ब्राह्मणाची मुलगी वाटत नाही, मराठ्याची वाटता”. तुम्हाला तिच्या धैर्याचे कौतुक करायचे होते. आज त्याच धैर्याला न्यायाची जोड मिळणे अपेक्षित आहे.
ही फेसबुक पोस्ट म्हणजे केवळ विनंती नसून एका संशोधकाचा आपल्या नेत्याकडे असलेला न्यायाचा हक्क आहे. माझ्या अचानक मृत्यू झाला तर डॉक्टर मनीषा जोशी चे फार हाल होतील कारण तिला वाचवणारे कोणी देखील नाही तेव्हा कृपया सर्व 20 वर्षाचा इतिहास लक्षात घेऊन तत्काळ कारवाई करावी. यापुढे तिला कोणीही तुमच्या नावाने किंवा नेत्याच्या नावाने दहशत दाखवणार नाही. तिला वीस वर्ष वाचवले मात्र तुम्ही थकलो आहे आणि म्हणून पंतप्रधान कार्यालयापासून ते मुख्यमंत्री कार्यालय पर्यंत सगळ्यांना मी कळवले आहे की तिला संरक्षण देण्यात यावे. डॉक्टर मनीषा जोशी हिचे पुढील पिढीसाठी चे संशोधन आणि कार्य ही एक राष्ट्रीय संपत्ती आहे आणि ती संरक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे.
आपला नम्र,
प्रवीण पप्पू शिंदे)




















