जिल्हा प्रतिनिधी पुणे
प्रवीण पप्पू शिंदे
९ डिसेंबर रोजी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली. हि हत्या अतिशय क्रूर पद्धतीने झाल्याने प्रकरण देशभर गाजले. धनंजय मुंडेंच्या गुन्हेगारी टोळीमुळे पहिल्यांदाच बीडची तुलना बिहारशी होऊ लागली.
सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर पोलीस गुन्हा दाखल करून घेत नव्हते. प्रशासकीय अधिकारी हाताशी धरून यापूर्वी असे अनेक खून मुंडेंच्या गुन्हेगारी टोळीने पचवले होते. मस्साजोग गावक-यांनी आंदोलन केले, मनोज जरांगे पाटील यांनी गावात जाऊन आंदोलनाची धार तीव्र केली. राज्यात अनेक ठिकाणी संतोष देशमुख यांच्या न्यायासाठी आंदोलने झाली तेव्हा गुन्हे दाखल करण्यात आले. त्याचवेळी आरोपी आमच्या जातीचे आहेत म्हणून त्यांना वाचवण्यासाठीही आंदोलने झाली. तेव्हा वाईट प्रवृत्तींच्या पाठीशी उभी राहणारी जातही महाराष्ट्राने पाहिली. ज्यांच्या हत्येमुळे धनंजय मुंडेंची गुन्हेगारी पार्श्ववभूमी देशासमोर आली त्या संतोष देशमुख यांची आज तिथीनुसार पुण्यतिथी आहे.
दरम्यानच्या काळात धनंजय देशमुख यांनी यांनी मोठ्या धीराने कुटुंबाची जबाबदारी सांभाळली तर दुसरीकडे भावाला न्याय मिळवून देण्यासाठी अनेक आंदोलनांत सहभाग घेतला, सरकार, प्रशासन आणि न्यायालयीन पाठपुरावा केला. डोंगराएवढे दुःख असतानाही वैभवीने बारावीच्या परीक्षेत उत्तम यश मिळवून सर्व विद्यार्थ्यांसमोर आदर्श निर्माण केला. MBBS ला प्रवेश मिळवून वडिलांचे स्वप्न पूर्ण केले. विराज आणि सत्यजित (धनंजय देखमख यांचा मुलगा) यांना सांगली जिल्ह्यातील सेनिकी शाळेत प्रवेश मिळाला आहे. हे दोघेही सैन्यात उच्च पदावर पोहोचतील अशी खात्री आहे. हे यश पाहण्यासाठी वडील असते तर त्यांना किती आनंद झाला असता, त्यांच्याशिवाय सर्व अपुरे असल्याचे मुले सांगतात व वडिलांच्या न्यायाची अपेक्षा करतात.
“माझे हातपाय तोडा परंतु माझ्या मुलांसाठी मला जिवंत राहू द्या” हि विनवणी समजण्याएवढे राक्षसांकडे हृदयच नव्हते. संतोष आण्णांनी पाणी मागितले तेव्हा नराधमांनी तोंडावर लघुशंका केली त्यावेळी या नराधमांनी क्रूरतेची परिसीमा ओलांडली. पाईप, लोखंडी रोडने अमानुष मारहाण करून एक आदर्श सरपंच संपवला. आरोपींनी मारहाण करतानाचे फोटो व व्हिडीओ काढले होते. तसेच ” टूकारपंती” ग्रुपवर व्हिडीओ कॉल करून मारहाणीचा असुरी आनंद घेतला होता.
३ मार्च २०२५ रोजी मारहाणीचे फोटो व्हायरल झाले ते पाहून प्रत्येकाच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले. पत्रकारांना बातम्या देताना हुंदका आवरत नव्हता. धनंजय मुंडेंने पाळलेल्या राक्षसांची क्रूरता महाराष्ट्राला, देशाने पाहिली. पाहणाऱ्या प्रत्येकाची तळपायाची आग मस्तकाला गेली.
घटनेला एक वर्ष झाले तरी कृष्णा आंधळे हा आरोपी फरार आहे. कोठडीत असणारे आरोपी अनेक देवस फरार होते. फरार असताना आरोपींना ज्यांनी मदत केली त्यांना सहआरोपी केले गेले नाही. आवादा कंपनीकडून वसूल केली जाणारी खंडणी धनंजय मुंडेंकडे जाणार होती, त्याच्याच बंगल्यावर खंडणीची बैठक झाली असे बोलले जाते. धनंजय मुंडेलाही सहआरोपी केले गेले नाही. स्वतःचे राजकीय वजन वापरून धनंजय मुंडेंच्या स्वतःचा बचाव करून घेतल्याचे बोलले जाते.
सुनावणी वेळी कोर्टाच्या आवारात धनंजय देशमुख यांना धमकावण्याचा प्रयत्न झाला. आरोपींच्या बचावासाठी कायदेशीर पळवाटा शोधण्याचा प्रयत्न सुरु आहे. तसेच वाल्मिक कराडला वाचवण्यासाठी १०० वकील लावले जाणार असल्याची माहिती आ.सुरेश धस यांनी दिली. “मी एक वर्षांपासून मी लढत आहे. परंतु न्याय मिळत नाही याचे दुःख आहे. आता मी खचून गेलो आहे” अशी हताश भावना धनंजय देशमुख यांनी व्यक्त केली आहे. धनंजय देशमुख यांनी आजवर मोठ्या धीराने हा लढा लावून धरला आहे. त्यांनी हताश होऊ नये. संतोष आण्णा देशमुख यांना न्याय मिळेपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्या सोबत आहे.
*मराठामार्ग* 🚩
आपला मराठा सेवक. प्रवीण पप्पू शिंदे. अखिल भारतीय माथाडी आणि ट्रान्सपोर्ट जनरल युनियन


















