ज्ञानेश्वर पाटेकर
गेल्या 24 वर्षांमध्ये भारत देशाच्या राजकारणा मध्ये जोमात घोडदौड करणाऱ्या लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) पक्षाचा पंचविसावा अर्थात
रोप्य महोत्सवी वर्धापन दिन विविध सामाजिक उपक्रमांनी अतिशय उत्साहाच्या वातावरणात संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये साजरा करण्यात आला, लोक जनशक्ती पार्टी (रामविलास ) लेबर सेलचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री शरद टेमगिरे यांच्या माध्यमातून रांजणगाव गणपती येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी प्रधान महासचिव अभिजीत पाटील प्रदेश उपाध्यक्ष शामकांत लांडे जनरल सेक्रेटरी रवींद्र नरवाडे सेक्रेटरी संतोष वायदंडे सोलापूर जिल्हाध्यक्ष सुनील कोकरे रवी पवार बळी सूर्यवंशी रुपेश राठोड तुषार साबळे शुभम यादव प्रकाश जामदार अजित पवार इत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
लोक जनशक्ती पार्टीचे संस्थापक रामविलास पासवानआणि भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून आणि अभिवादन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली या पुढील काळात महाराष्ट्र राज्यांमध्ये येत्या स्वराज्य संस्था आणि महापालिकेच्या निवडणुकीमध्ये पक्ष चांगल्या पद्धतीने कामगिरी करेल अशी ग्वाही याप्रसंगी लेबर सेलचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष शरद टेमगिरे यांनी दिली आहे.


















