😁*
जिल्हा प्रतिनिधी पुणे. प्रवीण पप्पू शिंदे
संकलन. दत्ता मोकाशी सर पिंपरी चिंचवड
राजस्थान मधील *खाटू शाम* या देवाचं महत्व सध्या खूप गाजत आहे. *हारेकां सहारा* म्हणजे पराभूतांचा आधार आहे हा खाटू शाम बाबा. खान्देशातून रोज गाड्या भरभरून स्त्रिया पुरुष या ठिकाणी येत आहेत. तों शामबाबा कोण आहे तें बघू या.
राजस्थान राज्यातील सीकर जिल्ह्यात खाटू हे गाव आहे. या ठिकाणी शाम बाबा नावाचे जागृत देवस्थान आहे. खाटू गावा वरुनं या देवाला खाटू शाम म्हणतात. या शाम बाबाची कथा थेट महाभारत काळातील आहे. या शाम बाबाचा खान्देशसी काय संबंध आहे तें आपण बघू या.
दुर्योधनाने पांडवाना लाक्षागृहात जाळून मारण्याचा कट केला होता. पण तें भुयार मार्गातून बाहेर पडून थेट खांडवंनातं मुक्कामाला राहिले. त्याकाळातील खांडव वन म्हणजे आजचे खान्देश आहे. त्याकाळातील एकचक्रानगरी म्हणजे आजचे एरंडोल. या एरंडोल मध्ये पांडवानी वास्तव्य केले होते. एरंडोल येथे येण्यापूर्वी तें जरंडी गावा शेजारील जंजाळा किल्ला ता सोयगाव इथे गेले. तिथे हिडंबा आणि भीमाचा प्रेम विवाह झाला. हे सर्व तुम्हाला माहिती आहे. या जंजाळा किल्ल्याची राणी होती हिडिंबा. भीम हिडिंबा यांना एक पुत्र झाला तों घटोत्कच.
मुरासूर नावाचा एक राक्षस होता. त्याची कन्या अहिलावती आणि घटोत्कच यांचा विवाह झाला. त्यांना तीन पुत्र झालें. त्यांची नांव बर्बरिक, मेघवर्ण आणि अंजनपर्व. मेघवर्ण महाभारत युद्धात कर्णाच्या हातून मारला गेला. अंजनपर्व हा नंतर जंजाळ किल्ल्याचा राजा झाला. त्याच्या नावावरून जरंडी जंजाळा जवळ झेंडेअंजन नावाचे गाव आहे. तर असे हे सर्व कुटुंब आपल्या खांदेशातील आहे. सोयगाव तालुका छ संभाजीनगर जिल्ह्यात आहे. पण तों अहिराणी भाषिक तालुका चाळीसगावला लागून आहे. भाषिक सांस्कृतिक आणि भौगोलिक दृष्ट्या सोयगाव तालुका खान्देशचा भाग आहे.
बर्बरिक हाच खाटू शाम आहे. तों खान्देश पुत्र बर्बरिक अत्यंत शक्तिशाली आणि शिवभक्त होता. त्यांनी शिव आणि काली यांची घोर तपश्या केली तेंव्हा शिवाने त्याला तीन शक्तीशाली बाण दिले होते. ज्याने तों एकाच वेळी स्वर्ग पृथ्वी आणि पाताळ नष्ट करू शकत होता. त्याची आई अहिलावती अत्यंत दयाळू होती. तीने बर्बरिक याला सांगितले बेटा तू तुझ्या शक्तीचा वापर गोरगरीब दिनदुबळ्यासाठी कर. त्यावर बर्बरिक याने आईला वचन देत, प्रतिज्ञा केली कीं, मी नेहमी हारणाऱ्यांच्या बाजूने युद्ध करिन.
कौरव पांडव यांच्यात महाभारत युद्ध सुरु झाल्यावर बर्बरिक त्या युद्धात भाग घ्यायला खान्देशातून कुरुक्षेत्राकडे निघाला. तेंव्हा श्रीकृष्णाला चिंता पडली कीं, बर्बरिक अत्यंत बलवान योद्धा आहे. त्याला कोणीहीं हरवू शकणार नाही. तों मात्र सर्वाना हरवू शकतो. त्याच्या प्रतिज्ञा प्रमाणे तों हारणाऱ्यांच्या बाजूने लढणार हे ठरले होते. त्यातूनच अनर्थ होणार होता. कारण युद्धात पांडव हरायला लागले तर बर्बरिक पांडवांच्या बाजूने लढला असता आणि कौरव सेना कापून काढली असती. त्यामुळे कौरव हरायला लागले असतें. कौरव हारत आहेत असं बघता बर्बरिक पांडवांची बाजू सोडून कौरावांच्या बाजूने लढायला लागला असता आणि त्याने पांडव सेना कापून काढली असती. तों कौरावांच्या बाजूने लढायला लागल्यावर पुन्हा पांडव हरायला लागले असतें. मग त्याने पुन्हा पांडवांच्या बाजूने लढत कौरव कापून काढले असतें. असं करत करत दोन्ही बाजूच सैन्य संपलं असत आणि शेवटी एकटा बर्बरिक जिवंत राहिला असता.
हा अनर्थ टाळण्यासाठी श्रीकृष्णानें ब्राह्मण वेष घेऊन त्याला रस्तात गाठला त्यांची भेट एका पिंपळवृक्षा जवळ झाली. कृष्णाला बर्बरिकच्या सामर्थ्यांची परीक्षा घ्यावी असं वाटलं. त्याने बर्बरिकला सांगितलं मी तुझ्या तीन बाणाचं सामर्थ्य जाणून आहे. त्याचं प्रात्यक्षिक मला करून दाखव. त्यावर बर्बरिक म्हणाला काय करू सांगा. त्यावर कृष्ण म्हणाला, तू या पिंपळ वृक्षाच्या सर्व पानांचा भेद एका बाणात घेऊ शकतोस? तसा बर्बरिकनें धनुष्यावर बाण लावून सोडला तसा त्या बाणाने एका क्षणात पिंपळ वृक्षाच्या प्रत्येक पानाच्या मधोमध छेद करून श्रीकृष्णाच्या पाया भोंवती घिरट्या घालायला लागला. तसा बर्बरिक ओरडला, महाराज पाय बाजूला करा. तुमच्या पाया खाली पिंपळ वृक्षाचे पान आहे. पाय बाजूला केला नाही तर तुमचा पाय भेदून बाण पानं छेदेल. कृष्णानें पाय बाजूला करताच बाणाने पानाचा वेध घेतला.
असा धनुर्धर कृष्णाने सुद्धा पाहिला नव्हता. पुढचा अनर्थ टाळण्यासाठी कृष्णानें त्याच्याकडून त्याचं शीर दान म्हणुन मागून घेतलं. बर्बरिककडे दिव्य शक्ती होती त्यांनी ओळखलं हा ब्राह्मण दुसरा तिसरा कोणी नसून आपला आजोबा भगवान श्रीकृष्ण आहे. तेंव्हा बर्बरिक याने क्षणाचा हीं विलंब नं करता त्याचे शीर कापून दिले. पण शीर देण्याआधी त्यानें श्रीकृष्णाला एक ईच्छा बोलून दाखविली. तों म्हणाला. *मला संपूर्ण महाभारत युद्ध पाहायचं आहे.* तेंव्हा श्रीकृष्णानें त्याचे तें शीर करूंक्षेत्रावर एका उंच टेकडीवर बर्बरिकच्याच तीन बाणांच्या टोकावर ठेवून दिले. त्यावेळी श्रीकृष्णानें त्याला वर दिला. *बर्बरिक बाळा धन्य आहेस तू. कलियुगात तुझी माझ्याच शाम नावाने लोक पूजा करशील आणि तू हारणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा सहारा होऊन त्यांचं दुःख निवारण करशील.*
ज्याने संपूर्ण महाभारत युद्ध डोळ्यांनी पाहिलं तों हा बर्बरिक. युद्ध संपल्यावर श्रीकृष्णने त्याचे अंतिम क्रियाकर्म करून तें शीर रुपमती नदीत सोडून दिलं. तें वाहत राजस्थाच्या सीकर जिल्ह्यात एका खाटू नावाच्या गावांत पोहचलं. तिथे तें कित्येक वर्ष मातीत रुतून बसलं. त्या खाटू गावाच्या नावावरून खाटू आणि कृष्णाच्या नावावरून शाम असं खाटू शाम नावाने बर्बरिक कलियुगात प्रसिद्ध झाला. हारणाऱ्यांचा सहारा झाला.
या मंदिरा बाबत असं सांगतात कीं, हे एक हजार वर्षापेक्षा अधिक जून हे मंदिर आहे. हे शीर घडिव दगडी मूर्ती आहे पण तें स्वयंभू आहे. वाहत आलेलं शीर जिथे जमिनी खाली पुरल गेलं होतं, त्या जागेवर येऊन एक गाय दुधाच्या धारा सोडायची. गावकऱ्यांना तों शुभ संकेत वाटला आणि त्यांनी तिथे खुदाई केली त्यांत बर्बरिकचं शीर मिळालं. कृष्णाच्या मिळालेल्या वरा नुसार त्याला लोक शामबाबा म्हणतात. तों नवसाला पावतो. त्याचे अनेक चमत्कार भक्तांनी पाहिले आहेत.
बर्बरिकचं धड तिथंच कुरुक्षेत्रात म्हणजे आजच्या हरियाणा राज्यातील हिस्सार जिल्ह्यातील स्याहडवा गावातील एका मंदिरात पूजले जाते. त्यालाही लोक खाटू शामच म्हणतात.
शिंदखेडे तालुक्यात एक गाव आहे कुरुकवाडे या गावातही खाटू शाम बाबाचे मंदिर आहे. खाटू गावातील मूर्ती सारखीच हीं मूर्ती आहे. याबाबत मला जास्त माहिती नाही. हे मंदिर कधी बांधले तेही माहीत नाही. पण मंदिर आणि मूर्ती छान आहे. ज्यांना राजस्थान मध्ये जाण शक्य नाही तें लोक इथे दर्शनाला येतात. तुम्ही सुद्धा जाऊन बघून या.
🙏🙏



















