मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक मनोहरबुवा वाडेकर व उद्योजक सुनील वाडेकर यांच्या मातोश्री, जुन्या पिढीतील सामाजिक कार्यकर्त्या स्व. पार्वतीबाई महादेव वाडेकर वय ८५ यांचे नुकतेच निधन झाले, त्यांच्या पश्चात दोन मुले व एक मुलगी सुना नातवंडे असा मोठा परिवार असून त्यांच्या निधनाने चाकणमध्ये शोककळा पसरली आहे, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रामध्ये त्यांचे योगदान मोलाचे होते, त्यांच्या निधनामुळे अनेक मान्यवरांनी आपली श्रद्धांजली अर्पण केली आहे यांची दशक्रिया विधी दिनांक29/11/25 रोजी 7.30 वाजता चक्रेश्वर मंदिर चाकण तालुका खेड येथे होणार आहे


















