मध्ये या शिर्षकाखाली प्रसिद्ध झालेला लेख वाचला. “गेल्या चाळीस वर्षात ज्यांची तीस अनुवादित आणि चार स्वतःची आत्मपर आणि ललित अशी पुस्तके प्रकाशित झालेली आहेत व आज नव्वदीत असताना त्यांचे ‘दुर्गा भागवत यांचे ‘व्यासपर्व ‘ हे पस्तिसावे हिंदी पुस्तक प्रसिद्ध होत आहे.अशा मुलखावेगळ्या माणसांच्या पक्तिंत चपखल बसणार्या, जिद्दी लेखिका वासंतिका पुणतांबेकर यांची प्रेरणादायी यशोगाथा तपशीलात विशद करणार्या या अभ्यासपूर्ण लेखाचा सुसूत्र,सविस्तर गोषवारा असा:—
वासंतिका या शतकारंभी स्थिरावलेल्या दत्तो अण्णा तुळजापूरकर या प्रख्यात वकिलांच्या कन्या.त्यांचे बंधू विद्यारण्य हे सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती होते.हैद्राबादहून मुंबईच्या गिरणगावात येऊन गेलेल्या वासंतिका यांनी १९५६ साली अकाउंटण्ट असलेले पुणतांबेकर यांच्याशी प्रेमविवाह केला आणि छोटा संसार थाटला. पश्चिम रेल्वेत नोकरी करणार्या वासंतिका पुणतांबेकर यांनी मुले मोठी झाल्यावर, वयाच्या पंचेचाळिसाव्या वर्षी एम.ए.केले.त्यांनी राष्ट्रभाषा प्रचारसभेच्या हिंदी परीक्षा दिल्या. पश्चिम रेल्वेत लेखनिकाची नोकरी करत असताना त्या त्यांच्या हिंदी अनुवादक बनल्या.
वयाच्या अठ्ठेचाळिसाव्या वर्षी त्याचे पहिले अनुवादित हिंदी पुस्तक प्रसिद्ध झाले.आजमितीस वयाच्या नव्वदीत असलेल्या वासंतिका पुणतांबेकर यांची गेल्या चाळीस वर्षात तीस अनुवादित आणि चार स्वतःची-आत्मपर आणि ललित अशी पुस्तके प्रकाशित झाली आहेत. वासंतिका पुणतांबेकर यांची सार्वजनिक कामे ‘गिरगाव ते गोरेगाव ‘ या त्यांच्या आत्मकथनात प्रत्येकाने वाचावीत अशी आहेत.त्यांचा हल्ला सर्व तर्हेच्या अनधिकृततेविरूद्ध असे. ‘रेल्वेमेन्स फेडरेशनने’ त्यासाठी त्यांचा गौरव केला.वासंतिका यांचे आयुष्य तसेच आहे.त्यांचे संगीत-साहित्यप्रेम अलाहिदा,त्यांचे आयुष्य जिद्दीने आणि निष्ठेने परिप्लुत आहे.त्यांचे पती पुरूषोत्तम पुणतांबेकर यांचे २०११ मध्ये निधन झाले.त्यानंतर त्या हट्टाने,दोन्ही मुलांच्या इच्छेविरूद्ध पुण्याजवळ खराडेच्या बेहरे वृद्धाआश्रमात राहत आहेत.
बेहरे वृद्धाश्रमात आल्यावरदेखील त्यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून तो रस्ता महापालिकेकडून डांबरी करून घेतला.त्यावर तीन सिग्नल आणले. स्वाभाविकच,त्या रस्त्याच्या उद्घाटनाला महापालिकेने आणि पोलिसांनी त्यांना सन्मानाने बोलावले होते.आज नव्वदीत असलेल्या वासंतिका पुणतांबेकर बेहरे वृद्धाश्रमात स्लिप डिस्कमुळे बिधान्यावर पडून आहेत.दोन सेविका त्यांची चोविस तास काळजी घेतात आणि एक लेखनिक त्यांचे नवे लेखन लिहून घेतो.त्यांची जिद्द,लेखन,तपस्या आणि हौस जराही कमी झालेली नाही.बाई उभ्या होत्या तोवर त्यांनी एक मिनिट वाया घालवले नाही.व्यक्तिगत आयुष्यात नीटनेटकेपणा व सौदर्य जपले.प्रत्येक गोष्ट हौसेने केली.ती त्यांची दृष्टी आश्रमातील खोलीतसुद्धा पाहण्यास मिळते.कपड्याची आणि कापडाची एक घडी बिघडलेली त्यांना चालत नाही.
त्यांचे पस्तिसावे हिंदी पुस्तक-दुर्गा भागवत यांचे ‘व्यासपर्व ‘ आामातील सहनिवासी आणि मित्र-नातेवाईक यांच्या उपस्थितीत प्रसिद्ध होत आहे.त्या अपंगत्वामुळे या समारंभात पाच-दहा मिनिटेच बसू शकतील, पण त्या मोहरून गेल्या आहेत.कारण या निमित्ताने त्यांचा माहेरचा तुळजापूरकर परिवार आणि सासरची मंडळी, मोठी झालेली दोन्ही मुले व आयएसएस होऊन दिगंत कीर्ती पसरवता झालेला नातू व स्नेहीजन एकत्र जमणार आहेत.पुस्तकही दुर्गाबाईचे…आणि दिल्लीच्या राजकमल या प्रतिष्ठित प्रकाशन संस्थेतर्फे होत आहे.होऊ घातलेला हा प्रकाशन समारंभ म्हणजे त्यांच्या कृतार्थ जीवनाची पोचपावतीच होय!ज्येष्ठ पत्रकार दिनकर गांगल यांनी वयाच्या नव्वदीतही लिहिणार्या जिद्दी लेखिका वासंतिका पुणतांबेकर यांच्या व्यक्तिमत्त्वावर टाकलेला हा अभ्यासपूर्ण प्रकाशझोत खरोखरच सुज्ञ वाचकांना थक्क करणारा,वाचनीय,
विचारप्रवर्तक व भावीपिढीला प्रेरित व प्रोत्साहित करणारा ठरतो हे मात्र तितकेच खरे!————————


















