*
*रामराव कुटे आणि त्यांच्या मित्र परिवाराच्या न्यायालयीन लढ्याला यश*
बकोरी तालुका हवेली येथे २०२०~२१ मध्ये झालेल्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये संतोष रानबा वारघडे हे ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आले होते, त्याप्रसंगी त्यांना दोन अपत्ये होती त्यानंतर साधारणपणे काही काळानंतर त्यांना पुन्हा एक अपत्य झाले, त्यामुळे तीन अपत्य झाल्यानंतर त्यांनी आपल्या ग्रामपंचायत सदस्य पदाचा राजीनामा न देता ग्रामपंचायत सदस्य पदाचा सर्व कार्यकाळ लाटल्याचे उघडकीस आले आहे
याप्रकरणी शासन नियमांची पायमल्ली झाली असल्याचे प्रतिपादन बकोरी येथील दत्तकृपा विविध कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन रामराव कुटे संतोष वारघडे यांच्या विरोधात जिल्हाधिकारी पुणे यांच्या आणून जिल्हाधिकारी न्यायालया मध्ये अर्ज दाखल केल्यानंतर सर्व पुरावे आणि कागदपत्रांची शहानिशा झाल्यानंतर संतोष वारघडे यांचे सदस्य पद जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दोन्ही बाजूंचा विवाद ऐकून महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ च्या कलम १४(१) (ज~१) च्या आधारे १४ नोव्हेंबर २०२५ रोजी अपात्र ठरवून संतोष वारघडे यांचे सदस्य पद रद्द केलेल्या आदेशाची प्रत पंचायत समिती हवेली,लोणी काळभोर कार्यालय , जिल्हा परिषद पुणे व ग्रामपंचायत बकोरी यांना देण्यात आली आहे, या सर्व प्रकरणांमध्ये रामराव कुटे यांना त्यांच्या मित्र परिवाराने संतोष वारघडे यांचे सदस्य पद रद्द करण्यात मोलाची कामगिरी बजावली आहे
*कोट*
*शासन नियमानुसार सन २००१ पासून तीन अपत्य असलेल्या व्यक्तीला कोणतीही निवडणूक किंवा कोणतेही राजकीय पद भोगता येत नाही संतोष रानबा वारघडे यांना बकोरीचे ग्रामपंचायत सदस्य झाल्यानंतर एक अपत्य झाले त्यामुळे एकंदरीत त्यांना तीन अपत्य असल्यामुळे नैतिक जबाबदारी ओळखून त्यांनी आपल्या ग्रामपंचायत सदस्य पदाचा राजीनामा देणे अपेक्षित होते परंतु त्यांनी तसे न करता शासनाची फसवणूक करून शासन नियमांचे उल्लंघन करून पुढील चार वर्ष सदस्य पद भोगले आहे त्यामुळे त्यांच्या विरोधात शासनाने योग्य ती कारवाई करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, जेणेकरून आगामी काळात राजकीय पदावरील सदस्य अशी बेफिकिरी करणार नाही*
रामराव कुटे मा. चेअरमन दत्तकृपा विविध कार्यकारी सोसायटी बकोरी



















