जिल्हा प्रतिनिधी पुणे.
प्रवीण पप्पू शिंदे
महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्षपदी संभाजी दहातोंडे पाटील यांची तर पुण्याचे अनिल ताडगे यांची उपाध्यक्ष पदी निवड.
मुंबई प्रतिनिधी दि 23
नवीन पदाधिकाऱ्यांची सर्वानुमते निवड
अखिल भारतीय मराठा महासंघची वार्षिक सर्वसाधारण सभा आज, *रविवार, 23 नोव्हेंबर 2025* रोजी *जिवाजीराव शिंदे संग्रहालय, मराठा मंदिर* येथे मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष *दिलीपदादा जगताप* यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाली.
या सभेसाठी महाराष्ट्रभरातून पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सभेदरम्यान प्रदेशस्तरीय तसेच राज्य कार्यकारिणीची निवड सर्वानुमते करण्यात आली. यामध्ये *प्रदेशाध्यक्षपदी संभाजी दहातोंडे पाटील यांची निवड जाहीर करण्यात आली. त्याचबरोबर पुढील पदाधिकाऱ्यांची राज्य कार्यकारिणीत निवड झाली.*.
.*राज्य सचिव , विलास शंकर देसाई, सांगली*.
* *उपाध्यक्ष (विदर्भ) राम मुळे अकोला*
* *उपाध्यक्ष : महेश सावंत, मुंबई-कोकण*
* *उपाध्यक्ष : अनिल ताडगे, पुणे* यांची निवड करण्यात आली.
सभेत गेल्या वर्षातील उपक्रम व संघटनात्मक कार्याचा सविस्तर आढावा घेऊन आगामी वर्षासाठी संघटनविस्तार, सामाजिक उपक्रम, युवकांचा वाढता सहभाग, तसेच शैक्षणिक-सामाजिक प्रकल्प या विषयांवर विस्तृत चर्चा करण्यात आली.
नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडीचे उपस्थितांनी स्वागत केले असून त्यांच्या नेतृत्वामुळे महासंघाच्या कार्याला अधिक दिशा, गती आणि परिणामकारिता मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
—



















