*
*खांडवी अहिल्यानगर येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार*
पुणे जिल्हा. प्रवीण पप्पू शिंदे
खांडवी ता. श्रीगोंदा अहिल्यानगर येथील सुभेदार मेजर बाळासाहेब खुडे (वय ५४) यांचे नुकतेच आकस्मिक निधन झाले, भारतीय शस्त्र सेनेची जाबाज आणि धाडसी 13 वी महार रेजिमेंट( थानपिर बटालियन ) चे सुभेदार म्हणून भारतीय सैन्य दलामध्ये 32 वर्ष सेवा केल्यानंतर नुकतीच त्यांनी सेवानिवृत्ती घेतली होती, मेजर खुडे यांचा अंत्यविधी खांडवी येथील त्यांच्या मुळगावी शासकीय इतमामात करण्यात आला,13 महार रेजिमेंटचे सेकंड ईन कमांडर लेफ्टनंट कर्नल चिमा साहेब बटालियनचे अधिकारी, धर्मगुरू आणि 18
सैनिक यांच्याद्वारे सलामी देऊन या योद्धास शेवटचा निरोप देण्यातआला.
या दरम्यान महार रेजिमेंटचे कर्नल ऑफ द रेजिमेंट लेफ्टनंट जनरल संदीप जैन ए व्ही एस एम, एस एम साहेब तसेच तेरा महार रेजिमेंट चे कमांडिंग ऑफिसर कर्नल फोगाट साहेब त्याचबरोबर युनिटचे सुभेदार मेजर महेश राम यांच्यातर्फे या योद्धास श्रद्धांजली देण्यात आली. यावेळी भारत माता की जय व मेजर बाळासाहेब खुडे अमर रहे या घोषणांनी आसमंत निनादून निघाला.
या अंतिम विधी सोहळ्याला बटालियनचे कमान अधिकारी, महार रेजिमेंटचे बटालियनचे कमान अधिकारी, माजी सैनिक संघ, गावचे सरपंच शासकीय व सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती याबरोबरच आजी-माजी सैनिक, बहुउद्देशीय वेल्फर असोसिएशन, महाराष्ट्र राज्य, शाखा पुणे “चे पदाधिकारी उपस्थित होते. अंत्यविधी सोहळा कॅप्टन बाबू पोळके यांच्या मार्गदर्शनाखाली, सुभेदार संतोष वानखेडे, सुभेदार मेजर पोपट आल्हाट,हवालदार शामराव भोसले, बुद्ध चव्हाण, कॅप्टन अरुण इंगोले याबरोबरच मोठ्या प्रमाणावरील माजी सैनिक यांच्या उपस्थितीत पार पडला.


















