:
आंबेगाव.
प्रवीण पप्पू शिंदे
पुराणानुसार या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासुर राक्षसाचा वध केला होता आणि त्याने बंदी बनवलेल्या १६,१०० स्त्रियांना मुक्त केले होते.
नरकासुराचा वध केल्यामुळे या दिवशी पापांचं नाश होतो, आणि आत्मा पवित्र होतो, असे मानले जाते.
यामध्ये अभ्यंग स्नान, तेल लावून स्नान, दीपदान, आणि यमराजाची पूजा केली जाते.
या दिवशी अकाल मृत्युपासून संरक्षण मिळावे म्हणून विशेष पूजा केली जाते. २०२५ मध्ये नरक चतुर्दशी कधी आहे?नरक चतुर्दशी: २० ऑक्टोबर २०२५, सोमवार
नरक चतुर्दशीला काय करावे?
१. अभ्यंग स्नान:
या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी उठून उटणे लावून तेलाचा अभ्यंग स्नान करणे अत्यंत शुभ मानले जाते.
अभ्यंग स्नान केल्याने शरीर शुद्ध होते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते व सौंदर्य वृद्धिंगत होते.
२. यम दीपदान:
या दिवशी यमराजासाठी दीपक लावला जातो.
घराच्या दक्षिण दिशेला बाहेर एक मातीचा दिवा लावावा, जो अकाल मृत्यूपासून संरक्षण करतो.
दीप लावताना खालील मंत्र म्हणतात:
मृत्युनाः पाशहस्तेन कालेन भवता वयम्।
त्रासिता स्म भयं घोरं यमदीपं प्रयच्छामि॥
३. रूप चौदस:
महिलांसाठी हा दिवस रूपसौंदर्य वृद्धीसाठी मानला जातो
[21/10, 4:45 pm] PRAVIN (PAPPU) SHINDE: उद्या बलिप्रतिपदा !
आपल्या बळीराजाचा उत्सव…
आंबेगाव. प्रवीण पप्पू शिंदे
‘बळीराजा’ हा या भुमीतल्या कष्टकर्यांचा, शेतकर्यांचा तारणहार असलेला महान राजा होता. आ.ह. तात्या म्हणतात तसा, ‘सात काळजांच्या आत जपून ठेवावा असा’, सद्गुणांचा राजा.
…भैरोबा, खंडोबा, ज्योतिबा हे आपले शूर पुर्वज बळीचे प्रतिनिधी होते. साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांपुढे बळीराजाचा आदर्श होता. शिवरायांनी शेतकऱ्यांची घेतलेली काळजी पाहून हे मनोमन पटतं की जिजाऊमातेनं त्यांना बालपणापासून बळीराजाच्या कार्याची महती सांगितली असावी.
खैबरखिंडीतनं आलेल्या युरेशियनांनी या भुमीवर आक्रमण केलं. कपटी वामनानं बळीराजाचा खून केला. त्याला पाताळात गाडला. तुकोबाराया म्हणतात, “बळी सर्वस्वे उदार । जेणे उभारिला कर ।। करुनी काहार । तो पाताळी घातला ।।” त्यानंतर या कारस्थानी जमातीनं इथलं फक्त सोनंच लुटलं नाही, तर इथलं समृद्ध, एकोप्याचं, गुण्यागोविंदाचं आयुष्य उद्धवस्त केलं. मुलनिवासींना गुलाम केलं. आजपर्यन्त त्याची विषारी फळं आपण भोगतोय. आजही या कपटी वामनाच्या वंशजांना बहुजनांमधला एकोपा नको असतो. असो.
दिवाळीच्या काळात आपला हा बळीराजा या भुमीवर परत येतो असं मानलं जातं… त्याला प्रिय असलेला कष्टकरी इथं सुखात नांदतोय हे दिसावं म्हणून सगळी दु:खं-वेदना बाजूला ठेवून सगळे बहुजन आनंदोत्सव साजरा करतात. सुगंधी उटणं लावून अंघोळ करतात. नवे कपडे घालतात. दिपोत्सव साजरा करतात. गोडधोड खातात. बहुजन माताभगिनी त्याच्या आठवणीत, “ईडा पिडा टळो, बळीचं राज्य येवो.” अशी प्रार्थना करत पुरूषांना ओवाळतात. जेणेकरून बळीराजा आनंदी होईल…
या बलिप्रतिपदेला आपला बळीराजा फक्त असा आनंदोत्सव साजरा करून प्रसन्न होणार नाही. बहुजनांमधल्या सगळ्या जातीवर्णांनी एकत्र येऊन भेदाभेदाविरूद्ध दंड थोपटून उभं रहायला पाहिजे. साक्षात ‘बळीराजा’ असलेल्या शेतकऱ्याची अवस्था आज दयनीय आहे. तो रोज आत्महत्या करतोय. स्त्रिया सुरक्षित नाहीत. आर्थिक शोषणानं कहर केलाय. हे अराजक नष्ट करण्यासाठी बहुजनांना खुप मोठा सामाजिक,सांस्कृतिक संघर्ष करावा लागेल. तरच इथली ‘ईडा पीडा’ टळेल आणि बळीचं राज्य येईल.
प्रत्येक बलिप्रतिपदेला हिंदू बहुजनांनी बळीराजाविषयी कृतज्ञता दाखवण्याची खुप गरज आहे. त्यासाठी गांवागांवात, घरोघरी बळीराजाच्या प्रतिमेचं पूजन करून… त्याची महती पुढच्या पिढ्यांना सांगून जर बलिप्रतिपदा साजरी झाली तरच खर्या अर्थानं आपल्या महानायकाच्या कार्याचा गौरव होईल.
माझ्या सर्व हिंदू बहुजन भावाबहिणींना उद्याच्या बलिप्रतिपदेच्या मनापासून शुभेच्छा !


















