मंचर:येथील श्री दत्तकृपा नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी पतसंस्थेचे संस्थापक बबन ज्ञानेश्वर मोरडे
यांची तर उपाध्यक्षपदी संजय दत्तात्रय मोरे यांची बिनविरोध निवड झाली आहे.
श्री दत्तकृपा पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली. बबन ज्ञानेश्वर मोरडे, संजय दत्तात्रय मोरे, लक्ष्मण दत्तात्रय बाणखेले, शिवाजी बापूराव निघोट, मगन म्हातारबा कराळे, बाळासाहेब रंगनाथ बाणखेले, बारकू सखाराम जगताप, संतोष पांडुरंग तागड, सविता प्रशांत मोरडे,उर्मिला भानुदास जुन्नरे यांची संचालकपदी बिनविरोध निवड झाली. त्यानंतर आज अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची निवड प्रक्रिया मंचर येथे पार पडली.अध्यक्षपदासाठी बबन मोरडे व उपाध्यक्षपदासाठी संजय मोरे यांचे एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी शांताराम शेटे यांनी केले.त्यानंतर मावळते अध्यक्ष शिवाजी निघोट व उपाध्यक्ष बाळासाहेब बाणखेले यांच्या हस्ते नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना दत्तकृपा पतसंस्थेचा लवकरच शाखा विस्तार केला जाईल. नजीकच्या काळात दोन नवीन शाखा सुरू करणार आहोत अशी माहिती अध्यक्ष बबन मोरडे यांनी दिली. मोरडे दत्तकृपा पतसंस्थेचे संस्थापक आहेत. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सचिव विजय गवळी यांनी काम पाहिले.


















