आंबेगाव. प्रवीण पप्पू शिंदे
पिंपरखेड ता.शिरूर,पुणे येथील अवघ्या ५.५ वर्षांच्या चिमुरडी शिवण्या शैलेश बोंबे हिचा बिबट्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना हृदय पिळवटून टाकणारी आहे.
सर्वसामान्य जनतेच्या वेदनेशी सदैव जोडलेले आणि तत्परतेने निर्णय घेणारे आदरणीय मा.गृहमंत्री मा.दिलीपराव वळसे पाटील यांनी त्वरित मंचर येथे जाऊन कुटुंबीयांची भेट घेतली,सांत्वन केले आणि प्रशासनाशी चर्चा केली.
या घटनेनंतर उत्तर पुणे जिल्ह्यातील तसेच राज्यातील बिबट्या-मानवी संघर्षावर नियंत्रण मिळवण्यासाठी 2 कोटी रुपयांचानिधी मंजूर करण्याची घोषणा केली असून,
यातून सुमारे 200 पिंजऱ्यांची व्यवस्था,आवश्यक मनुष्यबळ आणि सुरक्षात्मक उपाययोजना राबवली जाणार आहेत.
तसेच वन विभागाला तातडीने कार्यवाहीसाठी सक्त निर्देश दिले असून,शाश्वत तोडगा म्हणून ‘बिबट्या नसबंदी कायदा’ आणण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत.या विषयावर उपमुख्यमंत्री मा.ना.अजितदादा पवार यांच्याशी चर्चा करून पुढाकार घेतला आहे.
शिवण्याच्या आत्म्यास शांती लाभो आणि बोंबे कुटुंबाला या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो – हीच ईश्वरचरणी प्रार्थना..

















